Income Tax : 5000 रुपयांपर्यंत दंड, आता उरले दोन दिवस, 15 मिनिटात फाईल करा ITR
Income Tax : आयटीआर भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. आतापर्यंत ITR फाईल केला नसेल तर झटपट हे काम पूर्ण करा. त्यासाठी 15 मिनिटांचा वेळ काढा.
नवी दिल्ली | 30 जुलै 2023 : इनकम टॅक्स रिटर्न ( ITR File) फाईल करण्याची अंतिम मुदत संपत आली आहे. आयकराच्या परीघात येणाऱ्या करदात्यांनी आता घाई करावी. आयटीआर दाखल करण्यासाठी आज आणि उद्या हे दोन दिवस उरले आहेत. मुल्यांकन वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत (Deadline) 31 जुलै 2023 ही आहे. 1 ऑगस्टपासून आयटीआर भरणाऱ्यांना दंड द्यावा लागेल. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आता पुढे वाढविण्यात येणार नाही. आतापर्यंत ITR फाईल केला नसेल तर झटपट हे काम पूर्ण करा. त्यासाठी 15 मिनिटांचा वेळ काढा.
तर भरावे लागेल दंड
आयटीआर अंतिम मुदतीपूर्वी अथवा अंतिम मुदतीत भरणे गरजेचा आहे. नाही तर करदात्याला भूर्दंड द्यावा लागतो. करदात्यांना अनेक प्रकारच्या लाभापासून वंचित रहावे लागते. अंतिम मुदतीनंतर आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागतो. काही प्रकरणात तुरुंगाची हवा पण खावी लागू शकते. आयटीआर फाईल करण्यासंबंधी प्राप्तिकर खात्याचे नियम आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा फटका बसतो.
इतका बसेल दंड
आयकर नियमानुसार, करदात्याला 31 जुलैपर्यंत आयटी रिटर्न दाखल करावा लागेल. करदात्याला अपयश आले तर विलंब आयटीआर भरता येतो. त्यासाठी त्याला विलंब शुल्क भरावे लागते. 5 लाख रुपयांपेक्षा विलंब शुल्क 5,000 रुपये भरावे लागेल. तर ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना 1,000 रुपयांपेक्षा अधिकचे शुल्क आकारण्यात येते.
डिसेंबरपर्यंत भरता येईल रिटर्न
इनकम टॅक्स डिपार्टमेंट, करदात्यांना उशीरा आयटीआर भरण्याची सुविधा देते. हा बिलेटेड आयटीआर, म्हणजे विलंब आयटीआर भरण्याची किंमत मोजावी लागते. आयकर अधिनियम, 1961 चा नियम 139 (4) अंतर्गत याची व्याख्या करण्यात आली आहे. अंतिम मुदतीनंतर भरण्यात येणाऱ्या प्राप्तिकर रिटर्नला बिलेटेड रिटर्न असे म्हणतात.
नवीन टॅक्स स्लॅब
- 0 ते 3 लाख उत्पन्न – काहीच कर नाही
- 3 ते 6 लाख उत्पन्न- 5 टक्के कर
- 6 ते 9 लाख उत्पन्न- 10 टक्के कर
- 9 ते 12 लाख उत्पन्न- 15 टक्के कर
- 12 ते 15 लाख उत्पन्न- 20 टक्के कर
- 15 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न – 30 टक्के कर
जुनी कर प्रणाली
- 2.5 लाखपर्यंत – शुन्य कर
- 2.5 लाख ते 5 लाख पर्यंत – 5 टक्के
- 5 लाख ते 10 लाख पर्यंत – 20 टक्के
- 10 लाख ते त्यापेक्षा जास्त – 30 टक्के
असा भरा आयटीआर फाईल
- ई-फायलिंग पोर्टल (https://eportal.incometaz.gov.in/) वर जा
- तुमचा युझर आयडी आणि पासवर्डने लॉग-ईन करा
- ई-फाईल-आयकर रिटर्न-याठिकाणी आयकर रिटर्न दाखल करा
- मुल्यांकन वर्ष 2023-24 निवडा, कंटिन्यूवर क्लिक करा
- आयटीआर फाईलिंगचा प्रकार निवडा. ऑनलाईन पर्याय निवडा
- कर उत्पन्न आणि टीडीएस यानुसार तुमचा आयटीआर फॉर्म निवडा
- सर्व कागदपत्रे योग्य रितीने अपलोड करा
- काही प्रश्नांची उत्तरे द्या. चेक बॉक्स मार्क करा
- कर किती येईल, त्यानुसार कराचा भरणा करा
- प्रिव्ह्यू आणइ रिटर्न जमा करा. रिटर्न व्हेरिफाई करा
- ट्रान्झेक्शन आयडी आणि एकनॉलेजमेंट नंबर स्क्रीनवर दिसेल
- मोबाईल, ईमेलवर कन्फर्मेशन येईल