पोस्ट ऑफिसमध्ये 10 वर्षे वयानंतर मुलांच्या नावे उघडा हे खाते; जाणून घ्या दरमहा मिळणारे फायदे
एमआयएस हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. यात किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. (Open this account in the name of children after the age of 10 at the post office; know about the benefits you get every month)
नवी दिल्ली : पोस्ट ऑफिस एमआयएस ही एक बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि नंतर दरमहा व्याजाचा लाभ घेता येईल. हे खाते 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावावरदेखील उघडले जाऊ शकते. जर आपण हे खाते आपल्या मुलांच्या नावे उघडले तर दरमहा मिळणाऱ्या व्याज उत्पन्नामधून तुम्ही तुमच्या मुलांचे शाळांचे शुल्क जमा भरू शकता. सध्याच्या कोरोना महामारीत तर हा प्रत्येक आई-वडिलांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. एकीकडे मुले शाळेत जात नसतानाही पालकांवर शाळांच्या शुल्काचा भार कायम आहे. अशा परिस्थितीत पोस्टाची ही बचत योजना नक्कीच फायदेशीर ठरेल. (Open this account in the name of children after the age of 10 at the post office; know about the benefits you get every month)
एमआयएस हे खाते कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. यात किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या याचा व्याज दर 6.6 टक्के आहे. हे खाते एकट्याद्वारे उघडले जाऊ शकते. त्याचबरोबर तीन प्रौढ नागरिक संयुक्त खाते उघडू शकतात. मुलाचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असल्यास त्या मुलाच्यावतीने त्याचे पालक हे खाते उघडू शकतात. या योजनेची मॅच्युरिटी अर्थात परिपक्वता 5 वर्षांची आहे. यानंतर तुम्ही हे खाते बंद करू शकता.
2 लाख जमा केल्यावर प्रत्येक महिन्याला मिळतील 1100 रुपये
जर तुमचे मुल दहा वर्षांचे असेल व तुम्ही हे खाते त्याच्या नावाने उघडले असेल, तर होणारा फायदा लक्षात घ्या. तुम्ही या खात्यात 2 लाख रुपये जमा केले तर दरमहा 6.6 टक्के दराने 1100 रुपये व्याज म्हणून मिळतील. पाच वर्षांचा विचार केल्यास तुम्हाला निव्वळ व्याजापासूनच एकूण 66 हजार रुपये मिळतील. त्यानंतर 2 लाख रुपयांचा परतावादेखील मिळेल. साधारणपणे वयाच्या दहाव्या वर्षी कोणतेही मूल 5 व्या इयत्तेत असेल. अशा परिस्थितीत त्याच्या शिक्षणासाठी 1100 रुपये वापरता येतील. या पैशातून ट्यूशन फी जमा केली जाऊ शकते किंवा इतर किरकोळ खर्च करता येऊ शकतो. याची पालकांना मोठी मदत होईल.
.. तर प्रत्येक महिन्याला मिळतील 1925 रुपये
जर तुम्ही या खात्यात 3.50 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दार महिन्याला 1925 रुपये उपलब्ध होतील. खासगी शाळांमध्ये शिकणार्या मुलांसाठी ही एक मोठी रक्कम असेल. एवढ्या पैशातून शाळेची फी, शिकवणी फी व इतर किरकोळ खर्च सहज भागू शकेल. या योजनेत जास्तीत जास्त 4.50 लाख रुपये जमा करता येतात. या कमाल जमा रक्कमेवर तुम्हाला प्रत्यक्ष महिन्याला जास्तीत जास्त 2475 रुपये मिळतील. (Open this account in the name of children after the age of 10 at the post office; know about the benefits you get every month)
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ‘हिरा मंडी’मध्ये दिसणार एका खास भूमिकेत https://t.co/WJduXjEbOJ #SonakshiSinha #SanjayLeelaBhansali #HiraMandi
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
इतर बातम्या
गृह कर्ज घेणाऱ्यांनी प्रीपेमेंट करणे किती फायदेशीर?; जाणून घ्या याबाबत सर्व माहिती
नवऱ्यासोबत घटस्फोट, आता कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे मिनिषा लांबा? बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा