Train Ticket : कागदी तिकीटाला लवकरच रामराम! रेल्वे टाकणार हे मोठे पाऊल

Train Ticket : कागदी तिकीट लवकरच इतिहास जमा होऊ शकते. अर्थात याविषयीची अधिकृत घोषणा झाली नसली तरी रेल्वे मंत्रालयाने हे महत्वपूर्ण पाऊल टाकलं आहे.

Train Ticket : कागदी तिकीटाला लवकरच रामराम! रेल्वे टाकणार हे मोठे पाऊल
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 8:12 PM

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे तंत्रज्ञानाचा अंगिकार करत आहे. आता रेल्वे विभागाने ( Indian Railway) कात टाकली आहे. सुपरफास्ट ट्रेनपासून बुलेट ट्रेन आता लवकरच रेल्वेच्या ताफ्यात येत आहे. विमानतळाला लाजवतील असे स्मार्ट, हायटेक रेल्वे स्टेशन (Hitech Railway Station) होऊ घातले आहे. रेल्वे विभाग विविध नवनवीन योजना हाती घेत आहे. सातत्याने सुधारणा घडून येत आहे. आता एका दाव्यानुसार, रेल्वे खाते लवकरच कागदी तिकीट इतिहास जमा करण्याची शक्यता आहे. यामागे रेल्वे खात्याने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊलं आहे. यामुळे आता एक मोठा बदल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे टाकलं पाऊल रेल्वे खातं लवकरच प्रिटेंड रेल्वे तिकीट बंद करण्याची दाट शक्यता आहे. कारण रेल्वेने तिकीट छापाई होणाऱ्या प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेची तिकीट प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल होण्याची दाट शक्यता आहे. पण लागलीच हे काम होईल, असे नाही. त्यासाठी काही वेळ लागेल. पण ही प्रक्रिया सुरु होणार हे नक्की. तसेच तिकीट छपाईचे कंत्राट एखाद्या खासगी कंपनीला, ठेकेदाराला पण देण्यात येऊ शकते.

खासगी क्षेत्राच्या हातात 2017 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी याविषयीचे संकेत दिले होते. त्यानुसार, सरकार तिकीट प्रिटिंगचे काम तिसऱ्या व्यक्तीच्या, कंपनीच्या हातात देऊ शकते. रेल्वे विभागाकडे एकूण 14 प्रिटिंग प्रेस होत्या. त्यापैकी 9 प्रिटिंग प्रेस बंद करण्यात आल्या आहेत. आता रेल्वेकडे 5 प्रिटिंग प्रेस उरल्या आहेत. त्या पण आता बंद करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रिटिंग प्रेसला टाळे रेल्वे बोर्डाने झोनल रेल्वेला याविषयीचा आदेश दिला. बोर्ड अधिकाऱ्यानुसार, मुंबईतील भायखळा, कोलकत्ता जवळील हावडा, दिल्ली शकुरबस्ती, चेन्नईतील रोयापूर आणि सिंकदराबाद येथील सध्याच्या रेल्वे प्रिटिंग प्रेसला टाळे लावण्यात येणार आहे. याठिकाणी रिझर्व्ह आणि जनरल अशा दोन्ही प्रकारची तिकीटे छापण्यात येतात. तसेच रोख पावती आणि 46 प्रकारची मनी वॅल्यूची येथे छपाई करण्यात येते. प्रिटिंग प्रेस बंद करण्याचा निर्णय 2019 मध्ये घेण्यात आला होता.

ऑनलाईन तिकीटाच्या विक्रीत वाढ रेल्वे आता तिकीट पूर्णतः डिजिटल करण्याच्या तयारीत आहे. त्या मार्गावर रेल्वे एकएक पाऊल टाकत आहे. एका वृत्तानुसार, सध्या केवळ 19 टक्के तिकीट काऊंटरवरुन खरेदी करण्यात येत आहे. तर 81 टक्के तिकीटांची विक्री ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ही संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे तिकीटाची डिजिटलीकरण करण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.