Parenting Tips: तुमची मुलंही वाद घालू लागली आहेत का? या सोप्या पद्धतीने घाला त्यांची समजूत!

लहानपणी मुलांना बऱ्याच वेळेस वाद घालण्याची सवय लागते. पालकांनी आपलं म्हणणं ऐकावं यासाठी मुलं वाद घालू लागतात. काही सोप्या उपायांनी तुम्ही त्यांची समजूत घालून वाद घालण्याची सवय सोडवू शकता.

Parenting Tips: तुमची मुलंही वाद घालू लागली आहेत का? या सोप्या पद्धतीने घाला त्यांची समजूत!
kids argumentsImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 4:44 PM

आई-वडिलांनी (Parents) कितीही प्रयत्न केला तरी लहान मुलं (kids) सहजपणे चुकीच्या सवयींच्या (bad habits) जाळ्यात अडकतात. पुरेशी माहिती नसल्यामुळे लहानपणी मुलं, पालकांनी आपलं म्हणणं ऐकावं यासाठी त्यांच्याशी किंवा मोठ्या माणसांशी बरेच वेळा वाद (arguments) घालू लागतात. अशा वेळी आई-वडील त्यांना रागावून वेळीच त्यांच्या चुकीची जाणीव करून देतात. मात्र तुमच्या ओरड्यामुळे किंवा मारामुळे मुलं तुमचं सगळंच ऐकायला लागतील आणि वाद घालणं सोडतील, असं दरवेळेस होणं शक्य नाही. कधीकधी मुलं आक्रमक (aggressive) होऊन अजून वाद घालणं सुरू करतात. अशा वेळी काय करायचं हे पालकांना कळत नाही. मुलांशी डील कसे करावे, त्यांची समजूत कशी घालावी, (parenting tips) याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया..

जास्त कडक धोरण नको –

तुमच्या मुलाला वाद घालण्याची सवय लागलीअसेल, तर त्याच्याशी जास्त कठोरपणे वागू नका. अशा वेळी तुमचा ओरडा ऐकून किंवा मार खाऊन मुले आणखी हट्टी स्वभावाची होऊ लागतात. त्याचबरोबर त्यांना मारलं तर हळूहळू मुलांच्या मनात पालकांबद्दल असलेली भीतीही संपते. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना जास्त कडक धोरण ठेवू नये.

प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा –

मुलांना त्यांच्या वाईट अथवा चुकीच्या सवयींबद्दल ओरडण्यापेक्षा, त्यांना जवळ बसवून प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करा. आपण जे सांगतो, ते पालकांनी ऐकावेच, आपला हट्ट पूर्म करावा यासाठी मुलं बऱ्याच वेळा पालकांशी वाद घालतात. अशा वेळी त्यांना प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमाने समजूत घातल्यास मुलं तुमचं नक्की ऐकतील.

हे सुद्धा वाचा

मुलांना बोलण्याची संधी द्या –

अनेक वेळा मुलांना भांडताना किंवा वाद घालताना पाहून, बहुतांश पालक मुलांना ओरडून गप्प करतात. मात्र तुमच्या या वागण्याचा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि मुलांना राग येऊ लागतो. त्यामुळे मुलांना ओरडून शांत करण्यापेक्षा त्यांची संपूर्ण गोष्ट ऐकून घेतल्यानंतरच प्रतिक्रिया देणं श्रेयस्कर ठरते.

योग्य-अयोग्य यातील फरक समजवा –

मुलांची वाद घालण्याची वाईट सवय सोडवायची असेल तर त्यांच्याशी बोलून, त्यांना योग्य गोष्ट कोणती, अयोग्य काय , यातील फरक समजवा. त्यानंतर त्यांना वाद घालण्याच्या दुष्परिणामांचीही जाणीव करून द्या. आणि वाद घालणे ही चुकीची सवय असल्याचे समजवा. मुलांशी गोड बोलून, त्यांना प्रेमाने समजावले, तर त्यांच्या चुकीच्या सवयींचा विळखा सुटू शकेल.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.