Online Transaction : हुश्शार हो रं गड्या! नवीन सूचना वाच, मगच कर ऑनलाईन पेमेंट

Online Transaction : UPI पेमेंट करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आता ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय देयके महामंडळाने वापरकर्त्यांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास तुमची फसवणूक टळू शकते.

Online Transaction : हुश्शार हो रं गड्या! नवीन सूचना वाच, मगच कर ऑनलाईन पेमेंट
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 6:44 PM

नवी दिल्ली : सध्या UPI पेमेंट प्रचलित झाले आहे. गल्लीत येणाऱ्या भाजी विक्रेत्यापासून ते सुपरमार्केटपर्यंत ग्राहक कुठेही बिनधास्त युपीआय व्यवहार (UPI Transaction) पूर्ण करतात. युझर्स युपीआयचे विविध पेमेंट प्लॅटफॉर्म जसे की, PhonePe, Google Pay, Paytm वा इतर अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करतात. UPI पेमेंट करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण आता ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) वापरकर्त्यांसाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. त्यांच्या सूचनांचे पालन केल्यास तुमची फसवणूक टळू शकते. महामंडळाने युझर्ससाठी काही सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे सर्वांनीच पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानुसार, 2022 मध्ये देसात युपीआयच्या माध्यमातून 12,6000 अब्ज रुपयांहून अधिक 74 अब्ज व्यवहार झाले आहेत. या वाढत्या व्यवहारांमुळे देशात विकसीत या पेमेंट पद्धतीवर विश्वास असल्याचे दिसून येत असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने रुपे डेबिट कार्ड आणि भीम-युपीआय व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका सामान्य वापारकर्त्यासह व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने त्यासाठी एकूण 2,600 कोटी रुपयांची खास तरतूद केली आहे.

हे सुद्धा वाचा

योजनेनुसार, बँकांना चालू आर्थिक वर्षांत RuPay आणि UPI चा वापर केल्यास पॉईंट ऑफ सेल (PoS) आणि ई-कॉमर्स व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेटिव देण्यात येणार आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.

ऑनलाईन पेमेंट करताना या गोष्टी ठेवा लक्षात

  1. ऑनलाईन पेमेंट कपात होताना UPI पिनचा वापर करा
  2. वापरकर्त्यांना रक्कम प्राप्त करताना UPI पिनची आवश्यकता नसते
  3. जर पैसे प्राप्त करताना तुम्ही UPI पिनचा वापर करत असाल तर फसवणूक होऊ शकते
  4. तुम्हाला कोणी रक्कम स्वीकारण्यासाठी UPI पिन टाकण्याचा आग्रह करत असेल तर सावध रहा
  5. ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी समोरच्या युझर्सच्या कोडचा पडताळा घ्या
  6. रिसिव्हरचे नाव आणि कोड अगोदर तपासा. पडताळा न करता युपीआय पेमेंट अजिबात करु नका
  7. ऑनलाईन पेमेंट करताना UPI पिनचा वापर संबंधित अॅपच्या पेजवर करा. त्याशिवाय इतर ठिकाणी शेअर करु नका
  8. QR Code चा उपयोग केवळ पेमेंट करण्यासाठी करा. इतर कारणासाठी त्याचा वापर करु नका
  9. ऑनलाईन पेमेंट करताना स्क्रीन शेअरिंग अथवा एसएमएस फॉरवर्डिंग आधारे कोणालाही रक्कम हस्तांतरीत करु नका

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.