Pension : दरमहा 42 रुपयात आजीवन मिळेल पेन्शन, ही योजना तुमच्या उतारवयासाठी

Pension : तुम्हाला दरमहा 42 रुपयात आजीवन पेन्शनचा लाभ मिळवता येईल..

Pension : दरमहा 42 रुपयात आजीवन मिळेल पेन्शन, ही योजना तुमच्या उतारवयासाठी
पेन्शनचा मिळेल लाभImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 05, 2022 | 4:12 PM

नवी दिल्ली : अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) केंद्र सरकारची एक लोकप्रिय योजनी आहे. या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 1 जून 2015 रोजी केली होती. या योजनेत लाभार्थी 60 वर्षांचा झाला की, त्याला दरमहा 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन (Pension) मिळते.

या योजनेत आता बदल करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. या योजनेतील सदस्य संख्या मार्च 2022 पर्यंत 4.01 कोटी इतकी झाली आहे. हा आकडा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

या योजनेत निवृत्ती वेतनाची रक्कम, गुंतवणूक आणि वय याआधारे निश्चित होते. अटल पेन्शन योजनेचा लाभ कोणताही भारतीय नागरिक घेऊ शकतो. त्यासाठी या योजनेत वयाचे बंधन घालून देण्यात आले आहे. त्याआधारे वेतन निश्चिती करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

अटल पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी व्यक्तीचे वय 18 ते 40 या दरम्यान असायला हवे. 40 वर्षांवरील व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येत नाही. तर 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणालाही या योजनेचा लाभ घेता येत नाही.

Atal Pension Scheme मध्ये भाग घेण्यासाठी तुमच्याकडे एकतर पोस्ट खात्यात अथवा बँकेचे खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडलेले हवे. तर या योजनेचा लाभ घेता येईल.

सरकारने नुकताच या योजनेत बदल केला आहे. त्यानुसार, करदात्यांना, म्हणजे जे लोक कर भरतात, त्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही. यापूर्वी ज्या करदात्यांनी योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांना नियमातून सूट देण्यात आली आहे.

असंघटित कामगारांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. गेल्या आर्थिक वर्षात या योजनेत 99 लाख खाते उघडण्यात आले होते. हा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे यावर्षी मार्च 2022 पर्यंत या योजनेत एकूण 4.01 कोटी सदस्य झाले आहेत.

या योजनेत सहभागी होण्यासाठी अटल पेन्शन योजनेत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल. तुमच्या वय आणि कालावधीनुसार हप्त्याची रक्कम ठरेल. लवकर सुरुवात केल्यास अवघ्या 42 रुपयात योजनेत सहभागी होता येईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.