इंटरनेट कॅफेतून आधार काढताय? गाफिल राहणं महागाड पडेल! UIDAIचा सावधगिरीचा इशारा

आधार कार्डवर आपले नाव, पत्ता, पिता अथवा पतीचे नाव, छायाचित्रासह बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या ठेवणीचे चिन्ह असतात. या माहितीचा गैरवापर ही होऊ शकतो.

इंटरनेट कॅफेतून आधार काढताय? गाफिल राहणं महागाड पडेल! UIDAIचा सावधगिरीचा इशारा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 8:23 AM

इंटरनेट कॅपेवरुन (Internet Cafe) ई-आधार कार्ड काढताना गाफील राहू नका. आधार कार्ड (Aadhaar Card)आजच्या काळात खूप महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) सर्व आधारकार्ड वापरकर्त्यांना आधार कार्डच्या गैरवापराविषयी सतर्क केले आहे. तुमचा गाफिलपणा तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तुमच्या आधारकार्डची सुरक्षा आणि नियमन करणा-या प्राधिकरणाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा इशारा दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये प्राधिकरणाने ई-आधारकार्ड सेवा पुरविणा-या सार्वजनिक कम्प्युटर केंद्रावरुन आधार कार्ड डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. इंटरनेट कॅफेवर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो, असा इशारा प्राधिकरणाने दिला आहे. तुमच्या डाटाचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचा धोका असल्याने प्राधिकरणाने अशा ठिकाणी आधारकार्ड डाऊनलोड करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पण आधारबाबत एक एक उत्तम गोष्ट म्हणजे त्याचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची माहिती तुम्ही वेळोवेळी मिळवू शकता.आधार’च्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

तर गैरवापर लगेचच येईल लक्षात

आपल्या सर्वांना माहित आहे की, आधार कार्डमध्ये आपले नाव, पत्ता, वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि फोटो तसेच बोटांचे ठसे आणि डोळ्यांची ठेवण याच्या खुणा आहेत. अशा परिस्थितीत आपल्या आधार कार्डचा कोणी गैरवापर तर करू शकत नाही ना, अशी भीती अनेकांना वाटत असते.

जर तुम्हालाही आधार कार्डची सुरक्षा आणि गैरवापराबद्दल चिंता असेल तर तुम्ही आधार संकेतस्थळाला भेट देऊन गेल्या 6 महिन्यांत आधार कार्डच्या वापराबद्दल माहिती घेऊ शकता. UIDAIच्या संकेतस्थळावर तुम्हाला आधारचा वापर कधी आणि कुठे झाला आहे, याची संपूर्ण माहिती मिळते.

आधारचा दुरुपयोग कसा तपासणार

  1. तुमच्या ‘आधार’च्या वापराविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वप्रथम UIDAIच्या https://uidai.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
  2. आता खाली या आणि आधार सर्व्हिसेसवर क्लिक करा, त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
  3. नव्या पेजवर आल्यावर ऑथेंटिकेशन हिस्ट्रीचा पर्याय दिसेल, तिथे क्लिक करावं लागेल.
  4. ऑथेंटिकेशन हिस्ट्री पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.
  5. आता सेंड ओटीपीवर क्लिक करा. आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर 6 अंकी ओटीपी असणार आहे.
  6. 6 अंकी ओटीपी टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा.
  7. माहिती भरून ओटीपीची पडताळणी करण्यासाठी व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक करा.
  8. व्हेरिफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री तुमच्या स्क्रीनवर दिसेल. कुठे गेल्या 6 महिन्यात तुमचं आधार कार्ड कधी आणि कुठे वापरलं गेलंय हे तुम्हाला पाहता येणार आहे.
  9. https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर आधार प्रमाणीकरण तपासणे पूर्णपणे विनामूल्य आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  10. UIDAIच्या संकेतस्थळावर आधार प्रमाणीकरणाचा इतिहास तपासणे पूर्णपणे मोफत आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.
  11. UIDAIच्या संकेतस्थळावर या आधार कार्ड जारी करणाऱ्या UIDAI एजन्सीने आधारच्या संरक्षणासाठी विविध प्रणाली विकसित केली आहे. जेणेकरून तुमच्या आधारचा गैरवापर कोणीही करू शकणार नाही.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.