Petrol-Diesel Price : 1 लिटर पेट्रोलसाठी मोजा इतके रुपये, क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्याने होईल फायदा?

Petrol-Diesel Price : पेट्रोल -डिझेलचे भाव कमी झालेत की दरवाढीचा बसेल फटका

Petrol-Diesel Price : 1 लिटर पेट्रोलसाठी मोजा इतके रुपये, क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्याने होईल फायदा?
काय आहे भाव
Follow us
| Updated on: Jan 25, 2023 | 8:44 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) सातत्याने चढ-उतार होतात. गेल्या पंधरवाड्यात किंमती गगनाला भिडल्या आणि झरझर पुन्हा खाली उतरल्या. गेल्या व्यापारी सत्रात कच्चा तेलात जवळपास 2 टक्क्यांची घसरण दिसली. देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर त्याचा काय परिणाम झाला हे वेगळे सांगायला नको. या आंतरराष्ट्रीय किंमतींवरच देशातील इंधनाचा दर ठरविण्यात येतो. केंद्रासह स्थानिक कर लागू झाल्यानंतर या किंमतीत फरक दिसतो. देशात यावर्षी हिमाचल प्रदेश सरकारने डिझेलवरील कर वाढविल्याने 3 रुपयांनी किंमती वाढल्या. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती अपडेट केल्या आहेत. आज 25 जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price Today) कोणताच बदल झाला नाही.

गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. कर वाढविल्याने अथवा कपात केल्याने त्यात बदल झालेला आहे. पण गेल्या एक वर्षांपासून देशातील वाहनधारकांना मोठ्या किंमतींना पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. 22 मे नंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 102.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.52 रुपये तर डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 107.31 पेट्रोल आणि डिझेल 93.79 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.62 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.21 तर डिझेल 94.69 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 107.19 आणि डिझेल 93.67 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.48 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 106.86 तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.61 आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये  प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.