नवी दिल्ली: पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीत आज सातव्या दिवशीही वाढ करण्यात झाली आहे. ही पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 70 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज ही वाढ झाल्याने भारतातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दराने आता 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामध्ये दिल्ली (Dehli), मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये या शहरांचा समावेश आहे. राजधानीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 100.21 रुपये आणि 91.47 रुपये प्रति लिटर आहेत. तर मुंबईत आता पेट्रोल 115.04 रुपये आणि डिझेल 99.25 रुपये दराने विकले जात आहे.चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 76 पैशांनी वाढला असून तो आता 105.94 रुपये आणि डिझेल 96 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 109.68 रुपये आणि डिझेल 94.62 रुपये आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पेट्रोल डिझेलचे दर भारतात सातत्याने वाढत आहेत. काही दिवसांपुर्वी नामांकित दुधाच्या किमतीत देखील वाढ झाली. त्यानंतर एलपीजी सिलेंडरमध्ये चक्क 50 रूपयांनी वाढ करण्यात आली. सातत्याने होत असलेल्या दरवाढी विरोधात विरोधकांकडून सातत्याने केंद्र सरकारवरती टीका केली जात आहे.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 100.21 per litre & Rs 91.47 per litre respectively today (increased by 80 & 70 paise respectively)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 115.04 & Rs 99.25 (increased by 85 paise & 75 paise respectively) pic.twitter.com/edmrj5xCou
— ANI (@ANI) March 29, 2022
महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शहरात पेट्रोल डिझेलचा दर किती ?
शहर पेट्रोल डिझेल
कोल्हापूर 115.38 98.08
पुणे 114.4 97.11
अहमदनगर 114.93 97.69
औरंगाबाद 115.66 98.36
चंद्रपूर 111.47 98.38
गडचिरोली 115.9 98.66
नागपूर 114.69 97.48
पेट्रोल डिझेलच्या दर वाढीची माहिती गोल्ड ई टर्न या संकेतस्थळावरून घेण्यात आली आहे.
वाढत्या किमतींमुळे सामान्य लोकांचे खिसे लुटले जात आहेत.
सोमवारी, विरोधकांनी इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीतील वाढ मागे घेण्याची मागणी केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या विषयावर सभागृहात निवेदन मागितले. रशिया-युक्रेन युद्धामुळे किमती वाढल्याचा सरकारचा युक्तिवादही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी फेटाळून लावला.लोकसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, वाढत्या किमतींमुळे सामान्य लोकांचे खिसे लुटले जात आहेत.