Fuel shortage : तेल कंपन्यांकडून उधारीवर पेट्रोल, डिझेलचा पुरवठा बंद; इंधनाचा तुटवडा, डिलर्स अडचणीत

तेल कंपन्यांनी डिलर्सना उधारीवर पेट्रोल, डिझेलचा पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे डिलर्स अडचणीत आले असून, इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेल मिळत नसल्याने वाहने रस्त्यावर अडकून पडली आहेत.

Fuel shortage : तेल कंपन्यांकडून उधारीवर पेट्रोल, डिझेलचा पुरवठा बंद; इंधनाचा तुटवडा, डिलर्स अडचणीत
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 7:02 AM

मुंबई : पेट्रोल, डिझेलचे भाव (Petrol, diesel prices) गगनाला भिडले आहेत. वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या किमतींमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता तेल कंपन्यांनी डिलर्सना (Dealers) उधारीवर पेट्रोल, डिझेलचा पुरवठा बंद केला आहे. याचा परिणाम म्हणजे उरण परिसरात इंधनाचा तुटवडा जाणवत असून, पेट्रोल (Petrol) , डिझेल अभावी हजारो वाहने विविध रस्त्यांवर आणि पार्किंगमध्ये अडकून पडली आहेत. पेट्रोल, डिझेल वेळेत उपलब्ध होत नसल्याने याचा परिणाम उरणमधील अनेक प्रकल्पांवर झाला आहे. जेएनपीएअंतर्गत असलेले पाच बंदरे. त्यावर आधारित कंटेनर यार्ड, रासायनिक प्रकल्प, कंपन्या कार्यरत आहेत. विविध बंदरातून दररोज 17 हजार कंटेनर मालाची आयात, निर्यात होत असते. मात्र तेल कंपन्यांनी उधारीवर पेट्रोल, डिझेल देणे बंद केल्याने गेल्या शनिवारपासून उरण परिसरात पेट्रोल, डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका हा या परिसरातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे.

क्रेडिटवर इंधनाचा पुरवठा

विविध तेल कंपन्या या डिलर्सना 25 लाखांपासून ते एक कोटींपर्यंत पेट्रोल, डिझेल क्रेडिटवर देत होत्या. डिलर्स पेट्रोल, डिझेलची विक्री झाल्यानंतर कमिशन वगळून या पैशांची परतफेड करत होते. मात्र आता अचानक तेल कंपन्यांनी डिलर्सना उधारीवर पेट्रोल, डिझेलचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने, उरणमध्ये पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. अनेक वाहने इंधनाभावी रस्त्यावर उभी आहेत. पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आल्याने डिलर्स अडचणीत सापडले आहेत. दरम्यान दुसरीकडे आज राज्यभरातील डिलर्सकडून आपल्या विविध मागण्यांसाठी पेट्रोल, डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज आणि उद्या पेट्रोल, डिझेलचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत डिलर्सच्या मागण्या

डिलर्सने कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. पेट्रोल विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये शेवटची वाढ ही 2017 मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यानंतर माहागाई मोठ्याप्रमाणात वाढली आहे. तरी देखील कमिशनमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. सध्या डिलर्सला एक लिटर पेट्रोलमागे 2 रुपये 20 पैसे तर डिझेलसाठी 1 रुपया 80 पैसे कमशिन मिळते. मात्र यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी डिलर्सकडून करण्यात आली आहे. तसेच केंद्राने अचानक केलेल्या एक्साइज ड्यूटीमधील कपातीमुळे नुकसान झाल्याचा आरोप देखील पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आला आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.