Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण..तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव पुन्हा घसरले आहेत. त्याचा फायदा तुमच्या शहरात झाला काय? काय आहेत आजचे दर?

Petrol-Diesel Price | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा घसरण..तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले काय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 2:09 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेलाच्या किंमती घसरत आहेत. तरीही देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Rate) कुठलीही कपात झालेली नाही. तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव काय आहे..

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने (US Federal Reserve) महागाई आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा व्याजदर वृद्धीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वच वस्तूंवर, व्यवहारांवर त्याचा परिणाम दिसून येईल.

कच्च्या तेलाच्या किंमती घसरलेल्या असतानाही, भारतातील तेल कंपन्यांना अद्यापही नुकसान होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते भारतीय कंपन्यांना डिझेलवर अद्यापही 8 रुपयांचा प्रति लिटर तोटा सहन करावा लागत आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत मंगळवारी पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटर होती. तर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर होते.

चेन्नई मध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर मिळत होते. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर विक्री होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. पण देशातंर्गत पाच महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 7 एप्रिल 2022 रोजीपासून किंमतीत बदल झालेला नाही.

22 मे रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. तर काही राज्यांनीही त्यांच्या शुल्कात कपात केली होती. अबकारी कर कमी झाल्याने काही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 10 रुपयांची सवलत मिळाली.

सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी आली होती. मंगळवारी ब्रेंट क्रूड (Brent crude) 0.02 टक्क्यांनी घसरले. अमेरिकेसह युरोपमध्ये पुन्हा मंदीची शक्यता आहे. त्याचा परिणाम तेलाच्या मागणीवर होण्याची शक्यता आहे.

पण एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल-डिझेलचे दररोजचे दर जाणून घेऊ शकता . इंडियन ऑईलच्या ग्राहकांना RSP टाईप करुन 9224992249 या मोबाईल क्रमांक आणि बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी RSP टाईप करुन 9223112222 क्रमांकावर पाठवावा. तर, एचपीसीएल (HPCL) ग्राहक एचपीप्राइस (HPPrice) टाईप करुन तो 9222201122 या मोबाईल क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतो.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.