Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO : विना इंटरनेट घरबसल्या चेक करा पीएफ बॅलन्स, इतकी सोपी आहे प्रक्रिया

EPFO : पीएफ बॅलेन्स वारंवार चेक केल्यावर काही चूक तर होत नाही, खात्याशी संबंधित एखादी त्रुटी तर नाही नहे समजून येते.

EPFO : विना इंटरनेट घरबसल्या चेक करा पीएफ बॅलन्स, इतकी सोपी आहे प्रक्रिया
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 12:18 PM

नवी दिल्ली : जर तुम्हाला विना इंटरनेट (Without Internet) घरबसल्या तुमचे पीएफचे बॅलन्स चेक करायचे असेल तर ही पद्धत अत्यंत सोपी आहे. पीएफ ही आयुष्याच्या संध्याकाळी उपयोगी येणारी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीतून तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा एक ठराविक रक्कम दरमहा मिळते. आजची बचत उद्यासाठी फायदेशीर ठरते. तर विना इंटरनेट पीएफ मधील शिल्लक रक्कमेची माहिती घेण्यासाठी तुम्हाला कुठेच जायची गरज नाही. घरबसल्या पीएफ बॅलन्स (PF Balance) तपासता येईल. त्यासाठी तुम्हाली ईपीएफओद्वारे जाहीर केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाची मदत घ्यावी लागेल. एक प्रक्रिया पूर्ण करुन तुम्हाला पीएफ मधील शिल्लक रक्कम तपासता येईल.

व्याजदर किती केंद्रीय भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारच्या अनेक सामाजिक योजनांपैकी एक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) देशातील सर्व कर्मचाऱ्यांच्या पीएफचे व्यवस्थापन करते. सध्या ईपीएफ रक्कमेवर 8.15% टक्के दराने व्याज मिळते.

पीएफ बॅलन्स का चेक करावा

हे सुद्धा वाचा
  1. पीएफ बॅलन्स वारंवार चेक करणे तुमच्या फायद्याचे आहे.
  2. त्यामुळे सध्या तुमच्या खात्यात जमा होत असलेली रक्कमेची माहिती मिळते. खात्याशी संबंधित काही चूक असेल तर ती चूक समोर येते
  3. पीएफ बॅलन्स कर्मचाऱ्याच्या बचतीचा मोठा भाग आहे. नियमीत पणे खाते चेक केल्याने बचत किती झाली. त्यावर व्याज किती मिळाले याची सहज माहिती मिळते.
  4. अनेक नवीन बदल होतात. त्याची माहिती मिळेत. तसेच अत्याधुनिक तंत्राचा वापर वाढल्याने त्यासंबंधीची माहिती मिळते. केवायसी डिटेल्स अपडेट करता येतात.

एसएमएस सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

  1. EPFO सदस्य, ज्यांचे UAN सेवानिवृत्ती संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना त्यांच्या सर्वात अलीकडील योगदानाचा तपशील आणि भविष्य निर्वाह निधी शिल्लक एसएमएसद्वारे (SMS) मिळवता येईल.
  2. तुम्हाला फक्त 7738299899 वर “EPFOHO UAN ENG” या मजकुरासह एसएमएस पाठवायचा आहे. इथे तुमच्या प्राधान्याच्या भाषेतील पहिली तीन अक्षरे दर्शविली जातात. ( उदा. ‘ENG’) तुम्हाला एसएमएस तमिळमध्ये मिळवायचा असल्यास ‘TAM’, बंगालीसाठी ‘BEN’, हिंदीसाठी ‘HIN’ वगैरे लिहू शकता. ही सेवा 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे.
  3. या संदर्भात, तुम्ही तुमचे UAN तुमचे बँक खाते, आधार आणि PAN शी सिंक करायला विसरू नका. कारण EPFO त्याच्या सदस्यांचे तपशील संग्रहित करते. तुम्ही तुमच्या नियोक्त्याला तुमच्यासाठी सीडिंग करण्यास देखील सांगू शकता.

मिस्ड कॉल सेवेद्वारे EPFO बॅलन्स कसा तपासायचा?

  1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO सदस्य 011-22901406 या क्रमांकावर मिस कॉल देऊन पीएफ बॅलन्स तपासू शकता.
  2. यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून कॉल करावा लागेल.
  3. तुम्ही UAN पोर्टलवर नोंदणी केली असल्यास तुम्हाला तपशील प्रदान केला जाईल. या संदर्भात तुम्हाला तुमचा UAN लक्षात ठेवण्याची गरज नाही.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.