Scheme : योजना गरिबांची, फायदा श्रीमंतांना..कमी खर्चात, सुविधांचा पाऊस..या योजना तरी कोणत्या?

Scheme : अनेक योजना गरिबांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत, त्याचा फायदा श्रीमंतांनाही होत आहे..

Scheme : योजना गरिबांची, फायदा श्रीमंतांना..कमी खर्चात, सुविधांचा पाऊस..या योजना तरी कोणत्या?
योजनांचा फायदा श्रीमंतांनाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 5:15 PM

नवी दिल्ली : सरकारी योजना (Government Scheme) सर्वांसाठीच असतात. परंतु, काही योजना समाजातील गरीब घटकांसाठी (Weaker Section) तयार करण्यात येतात. त्यामुळे कमी उत्पन्न घटकांना त्याचा फायदा घेता येतो. यामध्ये आरोग्य योजनांचा (Medical Scheme) समावेश होतो. कमी उत्पन्न घटकातील लोकांना स्वस्तात अथवा मोफत उपचार मिळण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

गरिबांना मोफत अथवा स्वस्तात उपचार मिळण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना अथवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुरु केलेल्या आहेत.

या तिन्ही योजनांमध्ये कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा देण्यात येतात. तर स्वस्तात आणि मोफत उपचार देण्यात येत आहे. देशभर या योजनेतून अनेक गरीब लाभ घेत आहेत. पण सर्वच गरीबांना त्याचा फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे.

हे सुद्धा वाचा

Money9 ने याविषयीचा सर्व्हे केला आहे. त्यामध्ये आयुष्यमान भारत योजना अथवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनांचा फायदा नेमका कोणाला मिळतो याचा पडताळा करण्यात आला आहे.

सर्व्हेतून आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. कारण या योजनांमध्ये अल्प उत्पन्न गटापेक्षा मध्यम गटातील श्रीमंत या योजनांचा अधिक फायदा उचलत असल्याचे Money9 च्या सर्वेमध्ये उघड झाले आहे.

सर्व्हेनुसार, गरीब अथवा अल्प उत्पन्न गटातील केवळ 2 टक्के लोकांनाच या योजनांचा फायदा उठवता आला आहे. आयुष्यमान भारत योजनेत केवळ 5 टक्के गरीब लोकांनाच फायदा झाला आहे. म्हणजे 100 मागे केवळ 5 लोक योजनेशी जोडलेले आहे.

तर 15 हजार ते 35 हजार रुपयांची कमाई करणारा मोठा वर्ग आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेत आहे. या वर्गाची योजनेतील हिस्सेदारी 6 टक्के आहे. मध्यमवर्ग या योजनेचा फायदा घेत आहे.

तर 35 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न असणारा मोठा वर्ग ही या योजनेचा चाहता आहे. यातील अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 50 हजार ते त्यावरील उत्पन्न असणारे 2 टक्के कमाईदार ही योजनेचा लाभ घेत आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अल्प उत्पन्न घटकांसाठी आहे. पण या योजनेत श्रीमंत लोकांचा मोठा सहभाग आहे. ज्यांचे उत्पन्न 50 हजारांहून अधिक आहे, ते ही योजनेचा फायदा घेत आहेत. देशातील 28 टक्के श्रीमंत या योजनेशी जोडलेले आहेत.

पीएम सुरक्षा योजनेत केवळ 6 टक्के लोकच गरीब आहेत. केवळ 12 रुपयात ही योजना 2 लाख रुपयांचा विमा देते. या योजनेत 15 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणारे अनेक लोक लाभार्थी आहेत.

पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेत प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 330 रुपयांचा प्रिमियम द्यावा लागतो. पण या योजनेत सर्वाधिक लाभ मध्यम श्रीमंत वर्ग घेत आहे. ज्यांचे वेतन 50 हजारांपेक्षा अधिक आहे, असे 22 टक्के लोक योजनेचा फायदा घेत आहेत. तर केवळ 5 टक्के गरीब या योजनेचा फायदा घेत आहेत.

पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना तर सर्वात लोकप्रिय आहे. योजनेत केवळ 4 टक्के गरीबांनी खाते उघडले आहे. तर 14 टक्के मध्यम श्रीमंत तर तेवढेच श्रीमंत या योजनेशी जोडल्या गेले आहेत.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.