आता या वर्गाला देखील मिळणार पेन्शन, पाहा सरकारची काय योजना ?
केंद्र सरकारने समाजाच्या विविध वर्गासाठी योजना आणलेल्या आहेत. परंतू सर्वाधिक योजना या दारिद्र्य रेषे खालील लोकांसाठी असतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या लोकांसाठी या योजना असतात. आता असंघटीत मजूदरांसाठी देखील एक योजना आणली आहे.

केंद्र सरकारने आता असंघटीत मजूरांना आधार देण्यासाठी त्यांच्या भविष्यात म्हातारपणात जगता यावे यासाठी पेन्शन योजना सुरु करण्याची व्यवस्था केली आहे. या साठी केंद्र सरकारने खास तरतूद केली आहे. या पेन्शनचा लाभ अशा मजूरांना होणार आहे ज्यांचे हातावर पोट असते. अशा लोकांना निवृत्तिनंतरही काम करावे लागते. त्यामुळे अशा असंघटीत वर्गातील मजूरांना आता पेन्शनचा आधार मिळणार आहे. कोणत्या मजूरांना ही पेन्शन मिळणार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करायचे हे पाहूयात..
मजूरांसाठी पेन्शन स्कीम योजना
भारत सरकारने साल २०१९ मध्ये देशातील असंघटीत मजूरांना आर्थिकदृष्ट्या आधार देण्यासाठी आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना सुरु केली होती. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या मंजूरांना मिळत होता. या योजनेंतर्गत आता मजूरांना ३००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळत होती. या योजनेत मजूरांना दर महिन्याना काही पैसे बचत करावी लागत होती. यात मजूराच्या हप्त्या एवढात हप्ता सरकार जमा करीत असते.
कोण ठरणार पात्र
या योजनेत दुकानदार, ड्रायव्हर, रिक्षा चालक,शिवणकाम करणारे, प्लंबर, धोबी, केशकर्तन करणारे कामगार असा सर्व मजूरांना लाभ दिला जात आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार ग्राह्य धरले जातात, योजनेत किमान २० वर्षे योगदान द्यावे लागते. गुंतवणूकीआधारे निवृत्तीनंतर म्हणजे ६० वयानंतर दर महिन्याला पेन्शन दिली जाते.
असा करा अर्ज
पंतप्रधान श्रम योगी मानधान योजनेत अर्ज करण्यासाठी नजीकच्या कॉमन सर्व्हीस सेंटरला जावे लागत. तेथे या योजनेत रजिस्ट्रेशन करुन मिळते. रजिस्ट्रेशनसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागते. आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि सेव्हींग अकाऊंटचे पासबुक किंवा चेक बुक अशी कागदपत्रे द्यावी लागतात. रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यानंतर एक श्रम योगी कार्ड नंबर जारी केला जातो. या योजनेचा हप्ता तुमच्या बँकेतून दर महिन्याला कापला जाणार आहे.