EMI: तुमचा ईएमआय वाढणार का? दोन दिवसांत येणार निर्णय..
EMI : येत्या दोन दिवसांत तुमच्या खिश्याला पुन्हा कात्री लागण्याची दाट शक्यता आहे..
नवी दिल्ली : येत्या दोन दिवसांत तुमच्या खिशाला पुन्हा कात्री लागण्याची दाट शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) पतधोरण विषयक समिती (MPC) याविषयीचा निर्णय घेणार आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी समितीपुढे रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याशिवाय गत्यंतर नाही.
भारतीय रिझर्व्ह बँक महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी जो उपाय करेल. त्यामुळे तुम्हाला महागाईच्या झळा सहन कराव्या लागतील. तुमच्या खिश्याला कात्री लागेल.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने आणि इतर केंद्रीय बँकांनी व्याजदर वाढवले. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँक ही व्याजदर वाढवण्याची शक्यता आहे. आरबीआय येत्या शुक्रवारी सलग चौथी व्याज दर वाढ करण्याची दाट शक्यता आहे.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयने आतापर्यंत रेपो दरात 1.40 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि नोकरशहा यांना महाईच्या झळा सहन कराव्या लागतील. पुन्हा व्याजदर वृद्धीने ते हैराण होणार आहे.
रेपो दर चार टक्क्यांहून वाढून आता 5.40 टक्क्यांवर पोहचला आहे. पतधोरण समितीची (MPC) बैठक आजपासून सुरु झाली आहे. ही बैठक 30 सप्टेंबर रोजीपर्यंत सुरु राहिल. शुक्रवारी समिती रेपो दरात 0.50 टक्क्यांची वृद्धी करु शकते. त्यामुळे रेपो दर 5.90 टक्के होईल. त्यामुळे कर्ज पुन्हा महाग होईल आणि कर्जावरील ईएमआयमध्ये सुद्धा वाढ होईल.
यापूर्वी समितीने मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली होती. तर जून आणि ऑगस्ट महिन्यात रेपो दरात 0.50-0.50 टक्क्यांची वाढ झाली. ग्राहक मूल्य सूचकांकवर आधारीत किरकोळ महागाई दर ऑगस्ट महिन्यात 7 टक्क्यांवर पोहचला आहे.
पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात वृद्धीचा निर्णय होईल. त्यानंतर तुमचे होम लोन, कार लोन आणि इतर कर्जावरील ईएमआय यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.