Post Office : डबल रिटर्न स्कीम, असा मिळेल दुप्पट फायदा

Post Office : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत दुप्पट परतावा मिळेल. या योजनेत तुम्ही जितका पैसा जमा कराल, तेवढच व्याज मिळेल. ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जोखिम नसणारी ही गुंतवणूक आहे.

Post Office : डबल रिटर्न स्कीम, असा मिळेल दुप्पट फायदा
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 6:18 PM

नवी दिल्ली | 26 जुलै 2023 : वाईट काळात गाठिशी असलेला उपयोगात पडतो. गुंतवणूक वेळीच कामी येते. पण अनेक जण गुंतवणूक करताना संभ्रमात असतात. अनेकांना त्यांच्या पैशावर जोखिम नको असते. उलट त्यातून चांगला परतावा हवा असतो. पारंपारिक गुंतवणूकदार त्यामुळेच शेअर बाजारच काय म्युच्युअल फंडाकडे पण वळत नाही. त्याला सुरक्षित परतावा हवा असतो. त्यामुळे तो चांगल्या योजनेच्या शोधात असतो. तर दुप्पट परतावा असणाऱ्या अनेक योजना आहे. त्यात पोस्ट खात्याची किसान विकास पत्र योजना ( Kisan Vikas Patra Scheme) लोकप्रिय आहे. परंपरागतच नाही तर शेअर बाजारातील अनेक गुंतवणूकदारांनाही या योजनेची भुरळ पडली आहे. टपाल खात्याच्या या योजनेत अवघ्या 123 महिन्यांत रक्कम डबल होते. व्याजदारच्या (Interest Rate) बळावर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळतो.

एकदाच भरा पैसा

किसान विकास पत्र ही भारताची वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. मुदतीत तुमचा पैसा दुप्पट होतो. किसान विकास पत्र देशातील सर्व टपाल खाते आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी किसान विकास पत्रावर मिळणाऱ्या व्याजात वाढ केली. व्याज दर 7.2 टक्क्यांहून 7.5 टक्के वार्षिक करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

लवकर होईल दामदुप्पट रक्कम

1 जानेवारी 2023 रोजीनंतर किसान विकास पत्रात आता तुमचा पैसा 123 महिन्यांऐवजी 120 महिन्यातच डबल होतो. म्हणजेच आता पूर्वीपेक्षा गुंतवणूकदारांचे तीन महिने वाचणार आहेत. त्यांना आता डबल परतावा तीन महिन्यांअगोदरच मिळेल. केव्हीपीवर त्यांना सध्या 7.20% व्याज मिळत आहे.

कोण करु शकते गुंतवणूक?

किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूक करण्याचे वय कमीत कमी 18 वर्षे आवश्यक आहे. या योजनेत एकल खाते आणि संयुक्त खाते काढता येते. लहान मुलांच्या नावे पण योजनेत गुंतवणूक करता येते. हिंदू अविभक्त कुटुंब, ट्रस्ट यांना पण गुंतवणूक करता येते.

अशी करा गुंतवणूक

किसान विकास पत्रात (KVP) गुंतवणूक करण्यासाठी 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंत प्रमाणपत्र खरेदी करता येतात.

किती मिळते व्याज

केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून या योजनेवरील व्याज दरात वाढ केली आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.5 टक्के दराने परतावा मिळतो. या योजनेत एकरक्कमी 2 लाख रुपये जमा केले तर 115 महिन्यात 4 लाख रुपये मिळतात. या योजनेत कम्पाऊंडिंग इंटरेस्टचा फायदा मिळतो.

खाते बंद केले तर..

किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा
विधानपरिषदेत शिवीगाळ, भर सभागृहात दानवेंनी कोणाला वापरली अर्वाच्य भाषा.
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण
मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब vs किरण शेलारांमध्ये लढत, आघाडीवर कोण.
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?
नाहीतर भिडेंच्या मिशा कापणार, 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावरून कुणी घेरल?.
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी
विधान परिषदेसाठी भाजपकडून ही 5 नावं जाहीर, मुंडेंसह कोणाची लागली वर्णी.
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली
पंकजा मुंडेंचं भाजपकडून पुनर्वसन, विधान परिषदेची उमेदवारी मिळाली.
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?
हे काय मॅच जिंकणार! विधानसभेत त्यांच्या...'त्या' दाव्यावर कुणाचा टोला?.
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आम्ही 13 जुलैपर्यंतच वाट बघणार, त्यानंतर...जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम.
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं
मनोज जरांगे साहेब, जरा शब्दांना...शिंदे गटाच्या महिला नेत्यानं सुनावलं.
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून
कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन अन् घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून.
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा
सत्तेची वारी शेवटची..माझी लाडकी बहीण योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा.