Post Office Saving Account : पोस्ट खात्याने केला हा मोठा बदल, खाते उघडण्यापूर्वी घ्या जाणून

Post Office Saving Account : पोस्ट खात्याने बचत खात्याच्या नियमात मोठे बदल केले आहे. त्यामुळे पोस्टात खाते उघडण्यापूर्वी काय बदल झाले, याची माहिती जरुर घ्या. याविषयीची अधिसूचना यापूर्वीच पोस्ट खात्याने दिली होती.

Post Office Saving Account : पोस्ट खात्याने केला हा मोठा बदल, खाते उघडण्यापूर्वी घ्या जाणून
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 5:12 PM

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : देशभरातील गुंतवणूकदार अजूनही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. टपाल कार्यालयाचे देशभरात कोट्यवधी ग्राहक आहेत. पोस्टाच्या योजनांवर चांगला परतावा मिळत असल्याने पारंपारिकसह तरुण पण पोस्टाच्या योजनेत पैसा गुंतवतात. पोस्टाच्या खात्यात केलेली बचत बुडण्याची भीती नाही. कारण या योजनांना केंद्र सरकारचं पाठबळं मिळालेलं आहे. तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन बचत खाते (Post Office Saving Account) उघडणार असाल तर काय बदल केले, ते माहिती करुन घेणे आवश्यक आहे. खात्यासंबंधी नियमांमध्ये हा बदल (Saving Account Rules) करण्यात आलेला आहे. काय आहे बदल, जाणून घेऊयात.

अधिसूचना काढली

इकॉनॉमिक टाईम्समध्ये याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, केंद्रीय अर्थखात्याने 3 जुलै 2023 रोजी याविषयीचे एक ई-नोटिफिकेशन जारी केले आहे. या अधिसूचनेत टपाल खात्याच्या बचत खात्यासंबंधीच्या बदलाची माहिती देण्यात आली आहे. हे बदल खातेधारकांसाठी फायदेशीर ठरेल.

हे सुद्धा वाचा

संयुक्त खातेधारकांसाठी झाला हा बदल

यापूर्वी पोस्ट ऑफिस ग्राहकांना संयुक्त खाते उघडण्यासाठी केवळ दोन जणांना एक खाते उघडण्यासाठी परवानगी देत होते. आता ही संख्या वाढविण्यात आली आहे. तीन जणांना संयुक्त खाते उघडता येणार आहे. एक सदस्य संयुक्त खात्यासाठी जोडण्यात येणार आहे. तिघांना एकाच वेळी पोस्ट खात्यात जाऊन संयुक्त खाते उघडता येईल.

खात्यात रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात बदल

संयुक्त खात्यातील नियमांचा बदल आपण पाहिलात. आता खात्यातील रक्कम काढण्यासंबंधीच्या नियमात पण बदल करण्यात आला आहे. ग्राहकांना यापूर्वी पोस्टातील खात्यातून रक्कम काढण्यासाठी फॉर्म 2 भरावा लागणार होता. आता फॉर्म 3 भारवा लागणार आहे. या बदलामुळे ग्राहकांना खात्यातून अगदी 50 रुपये सुद्धा काढता येतील. पासबुक दाखवून ही रक्कम काढता येईल. यापूर्वी 50 रुपये काढण्यासाठी ग्राहकांना फॉर्म 2 जमा करावा लागत होता. पासबुकवर स्वाक्षरी केल्यानंतर त्याला रक्कम मिळत होती.

व्याजाच्या नियमात बदल

पोस्ट खात्याचा बचत योजनांवरील व्याजाच्या नियमात पण बदल करण्यात आला आहे. आता महिन्याच्या 10 व्या दिवसांपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जमा रक्कमेवर 4 टक्के व्याज दराचा लाभ मिळेल. ही व्याजाची रक्कम यावर्षाच्या अखेरीस बचत खात्यात जमा करण्यात येईल. कोणत्याही खातेधारकाचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत ज्या महिन्यात खातेदाराचा मृत्यू झाला, त्याच महिन्यात व्याज जमा होईल. दर तीन महिन्यांनी व्याजदराचा आढावा घेण्यात येतो.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.