Post Office Small Savings Scheme : नो रिस्क, कमाई फिक्स दहा वर्षात या योजनेत पैसे होतील दुप्पट

नो रिस्क, कमाई फिक्स अशी गुंतवणूक योजना शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत (Post Office Small Savings Scheme) तुम्हाला हमखास परताव्याची संधी मिळते. तसेच या गुंतवणुकीवर कसली ही जोखीम नाही. त्यामुळे सुरक्षित परताव्यासाठी (Return) या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

Post Office Small Savings Scheme : नो रिस्क, कमाई फिक्स दहा वर्षात या योजनेत पैसे होतील दुप्पट
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 12:05 PM

नो रिस्क, कमाई फिक्स अशी गुंतवणूक योजना शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच. टपाल खात्याच्या अल्पबचत योजनेत (Post Office Small Savings Scheme) तुम्हाला हमखास परताव्याची संधी मिळते. तसेच या गुंतवणुकीवर कसली ही जोखीम नाही. त्यामुळे सुरक्षित परताव्यासाठी (Return) या योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. टपाल खात्यातंर्गत मुदत ठेव योजना, मासिक बचत योजना, जेष्ट नागरिक बचत योजना, टपाल बचत खाते, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र या योजनांचा समावेश आहे. तसेच टपाल आवर्ती जमा खाते अर्थात आरडी आणि पीपीएफ या योजना देखील आहेत. यातील किसान विकास पत्र योजना आहे. यात गुंतवणूक केले पैसे दुप्पट करण्याची सोय आहे. किसान विकास पत्र (Kisan Vikas patra) या योजनेतून चांगला परतावा देण्यात येतो. यामुळे योजनांमध्ये गुंतवणूक करणा-यांची संख्या मोठी आहे. गुंतवणूक केल्यानंतर आयकरामध्ये देखील सवलत देण्यात येते. यामुळे गुंतवणुकीसोबतच कर बचतीसाठी देखील हा चांगला पर्याय आहे. देशातील प्रत्येक टपाल कार्यालयात किसान विकास पत्र काढण्याची सोय उपलब्ध आहे. बँक दिवाळखोरीत गेली तर ग्राहकाला किती ही गुंतवणूक केली असली तरी केवळ 5 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. पोस्ट खात्यात दिवाळखोरीचा कोणताच विषय नसल्याने येथील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. किसान विकास पत्र योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

व्याज दर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत सध्या वर्षागणिक 6.9 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या योजनेतील व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ होते. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुमचे पैसे 124 महिन्यात म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यात दुप्पट होतात.

गुंतवणुकीची मात्रा या अल्पबचत योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेत तुमच्या खात्यात 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करण्याची सोय आहे. गुंतवणुकीची कमाल मर्यादा स्पष्ट करण्यात आलेली नाही.

खाते कोण उघडू शकेल? पोस्ट ऑफिसच्या या योजनेत एक प्रौढ आणि तीन प्रौढ मिळून संयुक्त खाते उघडू शकतात. या योजनेत पालक अल्पवयीन अथवा बाळबोध, भोळसर व्यक्तीच्या नावेही खाते उघडता येते.

कालावधी या योजनेत जमा झालेली रक्कम अर्थ मंत्रालयाने ठेवीच्या तारखेपासून वेळोवेळी निश्चित केलेल्या मुदतपूर्तीच्या कालावधीत परिपक्व होईल.

मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद करणे किसान विकासपत्रातील खाते मॅच्युरिटीपूर्वी काही अटींवर केव्हाही बंद करता येते. एकाच खातेधारक किंवा संयुक्त खात्यात सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास हे खाते बंद केले जाऊ शकते. तसेच न्यायालयाचे आदेश वा 2 वर्षे 6 महिन्यांनंतर किंवा जमा करण्याच्या तारखेनंतर खाते बंद केले जाऊ शकते.

PAK vs AUS : भर मैदानात डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानी पंचांशी भिडला, म्हणाला ‘मला Cricket Rulebook दाखवा’, पाहा VIDEO

VIDEO: यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का?, आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू; sanjay raut यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Pune Metro Tax |आता 1 एप्रिलपासून पुणेकरांना बसणार मेट्रो कराचा भुर्दंड ; घराच्या किंमती वाढणार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.