मुंबई : गुंतवणुकीचा विषय आला की, जुनेजाणते सर्वाधिक महत्व देतात ते पोस्ट खात्याला. पोस्टात (Post office) गुंतवणूक केलेली रक्कम ही सुरक्षित राहत असल्याने अनेकांकडून आपली रक्कम पोस्ट खात्यातच गुंतवली जात असते. आगामी काळात तुम्हीदेखील गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांचा पर्याय तुमच्या डोळ्यासमोर ठेवू शकतात. या योजनांमध्ये चांगला परतावा मिळतो. शिवाय यामध्ये गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित असतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट ऑफिसमध्ये तसे नाही. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रकमेतून गुंतवणूक सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये (small saving schemes) ‘नॅशनल सेव्हींग्स् सर्टीफिकेट’ (NSC) देखील समाविष्ट आहे. पोस्टाच्या या योजनांबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
पोस्ट ऑफिसची ‘नॅशनल सेव्हींग्स् सर्टीफिकेट’ योजना सध्या वार्षिक 6.8 टक्के व्याजदर देते. व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ केले जात असून ते केवळ मॅच्युरिटीवर दिले जाते. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. या अल्प बचत योजनेत 1000 रुपये गुंतवल्यानंतर ही रक्कम पाच वर्षांच्या कालावधीनंतर 1389.49 रुपये होईल.
पोस्ट खात्याच्या या योजनेत किमान 1000 रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेत 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा ठेवलेली नाही.
या लहान बचत योजनेत, एक प्रौढ आणि तीन प्रौढ व्यक्ती संयुक्तपणे संयुक्त खाते उघडू शकतात. याशिवाय, अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने पालकदेखील योजनेमध्ये खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत, 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा अल्पवयीन बालक किंवा बालिका स्वतःच्या नावावरही खाते उघडू शकतो.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जमा केलेली रक्कम ठेवीच्या तारखेपासून पाच वर्षे पूर्ण झाल्यावर परिपक्व होईल.
या सरकारी योजनेत जमा केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी दावा केला जाऊ शकतो.
छोट्या बचत योजनेत व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. या योजनेंतर्गत काही विशिष्ट परिस्थितीत पाच वर्षांच्या कालावधीपूर्वीच खाते बंद केले जाऊ शकते. यामध्ये, एकल खातेदाराचा किंवा संयुक्त खात्यात उपस्थित असलेल्या सर्व खातेदारांचा मृत्यू झाल्यास मॅच्युरिटीपूर्वी खाते बंद केले जाऊ शकते. याशिवाय, न्यायालयाच्या आदेशानुसार खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
कच्च्या तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा भाव
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कारायचीये?, मग मल्टिकॅप फंड्सबद्दल जाणून घ्याच
BANK HOLIDAY: मार्च महिन्यात ‘या’ तारखांना बँका बंद, वेळेपूर्वीच पूर्ण करा कामं