Post office saving scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करा, व्याजासह कर सवलत मिळवा; पैसाही सुरक्षित

Post office saving schemes : पोस्टाच्या विविध अल्पबचत योजनेतील गुंतवणूक सुरक्षित परतावा तर देईलच पण कर सवलत ही मिळेल. गुंतवलेला (Investment) पैसाही सुरक्षित. बँक दिवाळखोरीत (Bank Default) गेली तर पाच लाख मिळतात. पण पोस्ट ऑफिसचे (Post Office) तसे नाही.

Post office saving scheme : पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवणूक करा, व्याजासह कर सवलत मिळवा; पैसाही सुरक्षित
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 12:14 PM

Post office saving schemes : सुरक्षित परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनेचा विचार करत असाल तर टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना फायदेशीर ठरतील. या योजनांमध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर यात गुंतवलेला (Investment) पैसाही पूर्णपणे सुरक्षित आहे. बँक दिवाळखोरीत (Bank Default) गेली तर फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसचे (Post Office) तसे नाही टपाल खात्याची सरकारने हमी घेतली आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक अगदी कमी रकमेत सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश आहे. सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे. एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या…

व्याज दर

पोस्ट ऑफिसच्या सुकन्या समृद्धी योजनेत सध्या वार्षिक 7.6 टक्के व्याजदर आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020पासून लागू करण्यात आला आहे. व्याज वार्षिक आधारावर मोजले जाते. वार्षिक आधारावर चक्रवाढ व्याज देण्यात येते.

दीड लाखांपर्यंत गुंतवणूक

एका आर्थिक वर्षात या अल्पबचत योजनेत किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. यानंतर त्या व्यक्तीला 50 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. एकरकमी या योजनेत ठेवी ठेवता येतात. एक महिना अथवा आर्थिक वर्षात ठेवींच्या संख्येवर कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.

खाते कोण उघडू शकेल?

सुकन्या समृद्धी योजनेत पालक 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. या योजनेअंतर्गत भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कोणत्याही बँकेत मुलीच्या नावे एकच खाते उघडता येते. हे खाते कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडले जाऊ शकते. जुळ्या किंवा तीन मुलींच्या बाबतीत दोनपेक्षा जास्त खाती उघडता येतात.

करसवलतीचे फायदे

सुकन्या समृद्धी योजनेत जमा झालेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या कलम 80सी अंतर्गत वजावट मिळू शकते.

योजनेचा कालावधी

या अल्प गुंतवणूक योजनेत गुंतवणूक सुरू केल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी खाते बंद करता येते. याशिवाय वयाच्या 18 वर्षानंतर मुलाच्या लग्नाच्या वेळीही अकाऊंट बंद करता येऊ शकते. लग्नाच्या तारखेच्या एक महिना आधी किंवा योजनेनंतर तीन महिन्यांनी खाते बंद होऊ शकते.

LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना

PVC Aadhaar Card: संपूर्ण कुटुंबाचा मजबूत जोड, एका मोबाईल क्रमांकावर संपूर्ण कुटुंबासाठी आधार कार्ड

‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.