Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची ही एकदम जबरदस्त स्कीम; 5000 रुपये दरमहा जमा करुन व्हा लखपती
Recurring Deposit : टपाल खात्याच्या अल्प बचत योजनांवर ग्राहकांना चांगला परतावा मिळतो. या सरकारी अल्प बचत योजनेवर 6.7 टक्के दरांनी व्याज देण्यात येते. यामध्ये गुंतवणूकदारांना चांगला फायदा होतो. ही योजना 5 वर्षांसाठी आहे.
टपाल खात्याच्या अल्पबचत योजनांवर अजूनही भारतीय मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. ही गुंतवणूक एकतर सुरक्षित असते आणि त्यावर सरकारची हमी मिळते. तर या योजनेवर जोरदार परतावा मिळतो. आवर्ती ठेव योजना लोकप्रिय आहे. ही RD Scheme लखपती करु शकते. यामध्ये प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवल्या जाते. या योजनेत मोठा परतावा मिळतो.
या योजनेत इतका फायदा
पोस्ट ऑफिसमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत बचत योजना राबवण्यात येतात. यामध्ये पोस्ट ऑफिस रिकेरिंग डिपॉझिट स्कीम (Post Office Recurring Deposit Scheme) टपाल खात्याच्या आवर्ती ठेव योजना लोकप्रिय आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षे निश्चित केला आहे. तो वाढवून 10 वर्षे करण्यात येतो. गेल्यावर्षी 2023 मध्ये मिळणाऱ्या गुंतवणुकीवरील व्याज दर हा 6.7 टक्के आहे. पूर्वी हा दर 6.5 टक्के इतका होता.
केवळ 100 रुपयांत उघडा खाते
आवर्ती ठेव योजनेचे खाते हे अगदी जवळच्या पोस्टात जाऊन उघडता येते. यामध्ये 100 रुपयांची गुंतवणूक करुन सुरुवात करता येते. अधिकत्तम गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा नाही. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये लहान मुलाच्या नावे पण खाते उघडता येते. अर्थात त्यासाठी आई-वडिलांच्या कागदपत्रांची गरज असते.
या बचतीवर कर्जाची पण सुविधा
जर तुम्ही टपाल खात्याच्या आवर्ती ठेव योजनेचे खाते उघडले असेल आणि एखाद्या अडचणीमुळे ते बंद करण्याच्या विचारात असाल तर पोस्ट ऑफिस मुदतपूर्व खाते बंद करण्याचा पर्याय देते. याठिकाणी तुम्हाला वाटल्यास कालावधी पूर्ण होण्याअगोदर खाते बंद करु शकता. यामध्ये तुम्हाला कर्जाची पण सुविधा देण्यात येते. अर्थात एक वर्षापर्यंत खाते सुरु राहिल्यानंतर जमा रक्कमेवर 50 टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यात येते. या कर्जावरील व्याजदर हा बचत योजनेपेक्षा दोन टक्के अधिक असतो.
10 वर्षांत जमा होतील 8 लाखांहून अधिक
जर तुम्ही या योजनेत 5 हजार रुपयांची गुंतवणूक कराल तर कालावधी पूर्ण झाल्यावर म्हणजे 5 वर्षांनी एकूण 3 लाख रुपये जमा होतील. त्यावर 6.7 टक्के दराने व्याजाचे 56,830 रुपये जमा होतील. म्हणजे एकूण 3,56,830 रुपये जमा होतील. जर तुम्ही हे खाते अजून पाच वर्षांसाठी सुरू ठेवाल तर या दहा वर्षात ही रक्कम 6 लाख इतकी होईल. त्यावर 6.7 टक्के दराने व्याजाची रक्कम 2,54,272 रुपये असेल. म्हणजे 10 वर्षात गुंतवणूकदाराला या योजनेत एकूण 8,54,272 रुपयांचा परतावा मिळेल.