ज्येष्ठांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेत गुंतवणूक करा, आयकरातूनही मिळेल सवलत
तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट खात्याच्या बचत योजनांमध्ये ती करु शकता. या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर तुमचे गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट विभागात तसं नाही.
मुंबई : आगामी काळात तुम्ही गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट खात्याच्या बचत योजनांमध्ये (Post Office Saving Scheme) ती करु शकता. या योजनांच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. त्याचबरोबर तुमचे गुंतवलेले पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतात. जर बँक डिफॉल्ट असेल तर तुम्हाला फक्त 5 लाख रुपये परत मिळतील. पण पोस्ट विभागात तसं नाही. त्याचबरोबर पोस्ट विभागाच्या बचत योजनांमध्ये अगदी कमी रकमेपासून गुंतवणूक करता येते. पोस्ट विभागाच्या छोट्या बचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) बचत योजनेचा समावेश आहे. या योजनेबाबत अधिक माहिती आपण घेऊया.
व्याज दर काय?
पोस्ट विभागाच्या जेष्ठ नागरिक बचत योजनेत सध्यस्थितीत वार्षिक 7.4 ठक्के वाज मिळते. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. 31 मार्च / 30 सप्टेंबर / 31 डिसेंबर या ठेवीच्या तारखेपासून व्याज लागू होते. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबरला व्याज दिले जाते.
गुंतवणुकीची रक्कम
या अल्पबचत योजनेत 1 हजार रुपयांच्या पटीत फक्त एकदाच रक्कम जमा करावी लागते. गुंतवणुकीची ही रक्कम 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
बचत खाते कोण सुरु करु शकतं?
जेष्ठ नागरिक बचत योजनेत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली कोणतीही व्यक्त खाते उघडू शकते. त्याचबरोबर 55 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेले सेवानिवृच्च कर्मचारीही खाते उघडू शकतात. मात्र सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आज ही गुंतवणूक करावी लागेल. या बचत योजनेत एखादी व्यक्ती स्वत: किंवा आपल्या जोडीदारासह वैयक्तिक किंवा संयुक्त खाते उघडू शकते. दरम्यान, संयुक्त खात्यातील एकूण ठेवी या केवळ पहिल्या खातेदाराच्या ठेवी मानल्या जातील.
मॅच्यूरिटी
या योजनेत खाते उघडल्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी ते बंद केले जाऊ शकते. यासाठी खातेधारकाने पासबुकसह योग्य तो अर्ज पोस्ट कार्यालयात जमा करणे गरजेचे आहे.
आयकर सवलत
या अल्पबचत योजनेत गुंतवणूक केलेल्या रकमेवर आयकर कायद्याच्या सेक्शन C नुसार सूट दिली जाते. त्यामुळे नोकरदारांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.
इतर बातम्या :