Crorepati Scheme : ही सरकारी योजना करेल करोडपती! जोखीम कमी, परताव्याची हमी

Crorepati Scheme : या सरकारी योजनेत म्युच्युअल फंडसारखाचा परतावा मिळू शकतो.

Crorepati Scheme : ही सरकारी योजना करेल करोडपती! जोखीम कमी, परताव्याची हमी
जोखीम कमी
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 5:17 PM

नवी दिल्ली : प्रत्येकाला चांगला परतावा आणि गुंतवणुकीतून जास्त फायदा हवा असतो. गुंतवणूकदाराला कोट्यधीश होण्याची स्वप्न पडतात. योग्य गुंतवणूक (Investment) केल्यास कोट्यधीश होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरु शकते. त्यासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला माहिती असणे आवश्यक आहे. काही सरकारी योजना (Government Scheme) पण तुम्हाला श्रीमंत करु शकतात. योग्य करोडपती होण्यासाठी तुम्हाला कम्पाऊंडिंगची शक्ती माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला मूळ रक्कमेवरील (Principal Amount) व्याजावर व्याज (Interest Rate) मिळते आणि त्यावरच तुमचा पैसा वाढतो. या गुंतवणुकीचा अगदी सोप्पा मंत्र आहे. जेवढी गुंतवणूक जास्त, तेवढा फायदा जास्त, गुंतवलेल्या रक्कमेच्या अनेक पटीत तुम्हाला दीर्घकालीन फायदा मिळतो.

शेअर बाजाराच जोखीम नको म्हणून अनेक जण चांगला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडात (Mutual Funds) गुंतवणूक करतात. पण म्युच्युअल फंडमधील पैसा शेअर बाजारातच गुंतवल्या जातो. त्यामुळे काही जण म्युच्युअल फंडापेक्षा जोखीम मुक्त पर्यायाच्या शोधात असतात. त्यांच्यासाठीही सरकारी योजनेत गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे.

अशा गुंतवणूकदारांना पब्लिक प्रोव्हिडंट फंडामध्ये (Public Provident Fund- PPF) गुंतवणूक करता येते. ही एक सरकारी योजना आहे. ही योजना अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहे. सध्या या योजनेवर केंद्र सरकार 7.1 टक्के व्याज देते. त्याआधारे दीर्घकालीन गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

तर करोडपती होणयाचे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी किती गुंतवणूक करणे आवश्यक ठरते? असा प्रश्न पडतो. या योजनेत केवळ 500 रुपयांपासून ते कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक गुंतवणूक करता येते. या योजनेत करोडपती होता येते. त्यासाठी दर महिन्याची गुंतवणूक जोरदार हवी.

तज्ज्ञांच्या मते या योजनेत गुंतवणूकदाराने दर महिन्याला कमीत कमी 12500 रुपयांची गुंतवणूक करावी. जर तुम्ही महिन्याला 65 ते 70 हजार रुपयांची कमाई करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी वरदान ठरेल. जोखीममुक्त योजनेत, चांगल्या परताव्याची हमी मिळेल. कमी गुंतवणूक केली तर लखपती तर हमखास व्हाल.

पीपीएफ योजना ही 15 वर्षांसाठी असते. त्यामुळे योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवल्यास 15 वर्षांत एकूण 22,50,000 रुपये जमा होतील. या रक्कमेवर चक्रवाढ व्याजाने 18,18,209 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीची एकूण रक्कम 40,68,209 रुपये इतकी असेल. ही रक्कम तुम्हाला जोखीममुक्त पद्धतीने मिळेल.

तुम्ही ही रक्कम न काढता पुढील दहा वर्षे अजून योजनेत गुंतवणूक कराल तर योजनेत तुम्ही 25 वर्षांपर्यंत गुंतवणूक कराल. 25 वर्षात 1.5 लाख रुपयांच्या हिशेबाने तुमची एकूण गुंतवणूक 37,50,000 रुपये होईल. त्यावर 7.1 टक्क्यांच्या हिशेबाने 65,58,015 रुपये व्याज मिळेल. मॅच्युरिटीवेळी ही रक्कम 1,03,08,015 रुपये होईल.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.