Mutual Fund : हीच ती स्कीम, अवघ्या 3 वर्षांत रक्कम दुप्पट, गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले

Mutual Fund : कमी कालावधीच्या योजनांमध्ये पण चांगला परतावा मिळतो? या योजनेची आकडेमोडच निराळी, तीन वर्षातच दामदुप्पट

Mutual Fund : हीच ती स्कीम, अवघ्या 3 वर्षांत रक्कम दुप्पट, गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 10:12 AM

नवी दिल्ली : म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) इतक्या योजना आणि इतके फंड झाले की, कोणत्या योजनेत रक्कम गुंतवू असा संभ्रम गुंतवणूकादारांसमोर कायम असतो. प्रत्येक योजनेत विविध उप योजना आहेत. त्यातील कोणती योजना निवडावी,पर्याय कोणता निवडावा याचा मोठा पेच गुंतवणूकदारांसमोर (Investors) असतो. थोडं ऑनलाईन सर्च केलं अथवा तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर तुमची निवड अचूक ठरु शकते. दीर्घकालीनच नाही तर काही कमी कालावधीच्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये ही गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला आहे. त्यांना दामदुप्पट परतावा (Double Return) मिळाला आहे. अवघ्या 3 वर्षांतच गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले झाली आहे.

अनेक म्युच्युअल फंडापैकी क्वांट स्मॉल कॅप फंडने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. या योजनेत तुम्ही जानेवारी 2020 एसआयपी (SIP) सुरु केली असती तर फायदा झाला असता. या योजनेत दरमहा 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर एकूण 6.96 लाख रुपये झाले असते.

दरमहा 10,000 रुपये गुंतवले असते तर तुम्ही योजनेत तीन वर्षांत 3.6 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्यावर व्याजाचा रक्कम, परतावा मिळून ही रक्कम 6.96 लाख रुपये झाली असती. म्हणजेच 93.4 टक्क्यांचा जोरदार परतावा मिळाला असता.

हे सुद्धा वाचा

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही जोखीमयुक्त असते. त्यात स्मॉल कॅप फंडातील गुंतणूक अधिक धोक्याची ठरते. या योजनेत तुम्हाला अंदाज लावता येत नाही. तुमचे अंदाज सपशेल फेल ठरतात. स्मॉल कॅप म्युच्युअल फंडा गुंतवणूक करत असलेल्या शेअरची किंमत सातत्याने कमी जास्त होते. त्याचा फटका बसू शकतो. हे फंड अस्थिर समजण्यात येतो.

या स्कीमचा प्रमुख वाटा हा आरबीएल बँक, पंजाब नॅशनल बँक, बीकाजी फुड्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये गुंतविण्यात येतो. आयटीसी या स्कीमच्या अग्रभागी आहे. शिवाय या फंडच्या यादीतील काही शेअर कायम अस्थिर असल्याचे दिसून येते.

या योजनेतील गुंतवणूकदार दुप्पट परतावा मिळाल्याने आनंदी आहेत. त्यांना चांगला परतावा मिळाला आहे. क्वांट स्मॉल कॅप फंडचा आकार जवळपास 2870 कोटी रुपये आहे. योजना बघता ही रक्कम ठीक मानण्यात येऊ शकते.

खरंतर स्मॉल कॅप म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही. तरीही काही स्मॉल कॅप योजनांनी अल्पावधीत जोरदार परतावा दिला आहे. या योजनेविषयीची संपूर्ण माहिती, फंडची आतापर्यंतची कामगिरी, तज्ज्ञाचा सल्ला या काही मुद्यांवर तुम्ही विचार केला, अभ्यास केला तर फायदा आणि तोट्याचे गणित समजून घेऊ शकता.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूकदारांनी त्यांचा अभ्यास, तज्ज्ञांचा सल्ला याचा विचार करुन त्यांचा म्युच्युअल फंड निवडावा. गुंतवणुकीसाठी कोणतेही घाई करु नये.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.