Train : म्हशीने मारली टक्कर, रेल्वेचे नुकसान नाही, पण आता बदल करणार असा काही..

Train : म्हशीने टक्कर मारल्याने वंदे भारत रेल्वेचा मुखडा बिघडला होता, आता या प्रकरणी हा बदल करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे.

Train : म्हशीने मारली टक्कर, रेल्वेचे नुकसान नाही, पण आता बदल करणार असा काही..
trainImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 8:34 PM

नवी दिल्ली : म्हशीने (Buffalo) टक्कर मारल्याने वंदे भारत ट्रेनचा (Vande Bharat Train) मुखडा बिघडला होता. दुरुस्तीचे आणि मेकओव्हरचे काम केल्यानंतर वंदे भारत पुन्हा तिच्या मुळ आवतारात धावली. वंदे मातरमचा लूक अनेकांना आवडला आहे. पण साध्या म्हशीच्या टक्करेने या रेल्वेचा चेहरा-मोहरा बदलला होता. त्यामुळे आता अशा समस्यांचा सामना करण्यासाठी काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) हे अहमदाबाद दौऱ्यावर आहेत. त्यांना तिथे वंदे भारत रेल्वेच्या अपघाताविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. भारतीय रेल्वेला सर्वच भागातून प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅक हा ग्रामीण भागातून, शेताजवळून जात असल्याने प्राणी, गुरं-ढोरं धडकण्याच्या घटना घडतात. त्यावर आता उपाय योजना करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेचाच मेकओव्हर करण्यात येणार आहे. अशा घटना उद्धभवू नये यासाठी रेल्वेत बदल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. कालच्या घटनेने वंदे मातरमचे नुकसान झालेले नाही. पुढच्या भागाची दुरुस्ती केल्यानंतर ही ट्रेन लागलीच धावली .

हे सुद्धा वाचा

वंदे भारतच्या वेगाला म्हशींनी ब्रेक लावला होता. त्यानंतर हायस्पीड रेल्वे वंदे भारतला गुरुवारी अपघात झाला. यामुळे रेल्वेचा पुढील भाग अर्ध्याच्यावर डॅमेज झाला होता. या घटनेत जीवीतहानी झाली नाही. पण रेल्वेचा पुढचा भाग क्षतिग्रस्त झाला होता.

वंदे भारत ट्रेनची दुरुस्ती मुंबई सेंट्रल कोचिंग केअर सेंटरमध्ये करण्यात आली. येथील कर्मचाऱ्यांनी ही रेल्वे काही तासाताच पूर्ववत केली. या रेल्वेच्या पुढच्या भागाला लागलीच जोडण्यात आले. त्यामुळे ही रेल्वे पुन्हा अहमदाबाद-मुंबई या प्रवासी मार्गासाठी सज्ज झाली.

असे अपघात टाळण्यासाठी ट्रॅकवरही लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. तसेच हायस्पीड रेल्वे ट्रॅकवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तसेच रेल्वे गाड्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी लवकरच उपाय योजना करण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.