Railway Stone Pelting : रेल्वेवर दगडफेक कराल तर तुरुंगात फोडावी लागेल खडी! इतक्या वर्षांचा होईल कारावास

Railway Stone Pelting : रेल्वेवर दगडफेक केल्यास तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.

Railway Stone Pelting : रेल्वेवर दगडफेक कराल तर तुरुंगात फोडावी लागेल खडी! इतक्या वर्षांचा होईल कारावास
तर शिक्षेची तरतूदImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 04, 2023 | 7:48 PM

नवी दिल्ली : हावाडा ते न्यू जलपाईगुडी या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसवर (Vande Bharat Express) गेल्या दोन दिवसांपासून दगडफेक (Stone Pelting) होत आहे. देशातील कानाकोपऱ्यात काही समाजकंटक धावत्या रेल्वेवर, लोकलवर दगडफेक करतात. काही जण चोरीच्या उद्देशाने, मोबाईलच्या मोहात प्रवाशांना दुखापत करतात. काही घटनांमध्ये प्रवाशांचा जीवही धोक्यात आला आहे. काहींना डोळा गमवावा लागला आहे. या सर्व प्रकारांविरोधात रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा व्यवस्था समाज कंटकांविरोधात कारवाई करते. याविषयी रेल्वेचे कायदे अत्यंत कठोर असून तुम्हाला तुरुगांत खडीही फोडावी लागू (Jail) शकते.

रेल्वेचे नुकसान झाल्यास आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका पोहचल्यास रेल्वे कायद्यानुसार (The Indian Rlys Act 1989) शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये रेल्वे कायद्याचे कलम 150 आणि त्याचे उपकलम (2) नुसार शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित आरोपीला शिक्षा होते.

आरोपी जर रेल्वे जर दगड अथवा अन्य पदार्थ, वस्तू फेकत असेल आणि रेल्वेसह प्रवाशांच्या जीवीताला हानी पोहचवत असेल तर अशी व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. या प्रकारात संबंधिताला कायद्यानुसार शिक्षा करण्यात येते. आरोपीला आजीवन अथवा 10 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा होते.

हे सुद्धा वाचा

रेल्वे कायद्याच्या (The Indian Rlys Act 1989) कलमात(150. Maliciously wrecking or attempting to wreck a train) शिक्षेची माहिती देण्यात आली आहे. जर एखादी व्यक्ती पहिल्यादाच अशी कृती करत असेल तर त्याला कमीत कमी 3 वर्षांची शिक्षा होते.

तर दुसऱ्यांदा अशी व्यक्ती दगडफेक अथवा नुकसान करणारी कृती करत असेल तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. सदर व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा ठोठाविण्यात येते. दगडफेकीच्या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा सुनावण्यात येते.

सेमी हायस्पीड ट्रेन (Semi High Speed Train) वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेकीची पहिल्यांदाच घटना घडली आहे. हावडा ते न्यू जलाईगुडी या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर ही दगडफेक करण्यात आली. ही घटना या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी, 2 जानेवारी रोजी घडली होती. या घटनेत रेल्वेच्या काचेचे नुकसान झाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.