Railway Rules : रेल्वे डब्ब्यातील मिडल बर्थची वेळ ते वेटिंग तिकीटावर प्रवास, समजून घ्या आठ नियम

ट्रेनमध्ये अनेकदा प्रवाशांना बेडरोल, टॉवेल आणि उशा न धुताच दिल्या जातात. मात्र आता असं होणार नाही. रेल्वेने यासाठी कडक पावलं उचलली आहेत. दुसरीकडे रेल्वेचे काही नियम प्रवास करताना माहिती असणं गरजेचं आहे.

Railway Rules : रेल्वे डब्ब्यातील मिडल बर्थची वेळ ते वेटिंग तिकीटावर प्रवास, समजून घ्या आठ नियम
Railway Rules : रेल्वे प्रवास करण्यापूर्वी हे आठ नियम लक्षात ठेवा, अडचणीच्या वेळी होईल मदत
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 5:13 PM

मुंबई : रेल्वेने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. स्वस्त आणि वेळेत पोहोचण्यासाठी उत्तम पर्याय आहे. भारतीय रेल्वे देशातील राज्य आणि शहरांशी जोडलेलं आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग लाभल्याने रेल्वेही चांगल्या सुविधा पुरविण्यावर भर देते. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने काही नियम बनवले आहे. यामुळे तुम्हाला प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत नाही. आज आपण अशाच आठ नियमांबाबत जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रवास सुखकर करता येईल.

मिड बर्थची वेळ – जर तुम्ही रेल्वेत मिडल बर्थ बुक केलं असेल, तर त्याची वेळही निश्चित करण्यात आली आहे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मिडल बर्थ खाली करता येत नाही. कारण यामुळे अडचण होऊ शकते.

तिकीट तपासणीस रात्री त्रास देऊ शकत नाही – रेल्वे नियमानुसार टीटीई रात्री 10 नंतर प्रवाशांना त्रास देऊ शकत नाही. त्याचबरोबर रात्री 10 नंतर ट्रेनमधील लाईट बंद केली जाते.

खाण्याच्या वस्तुंवरील नियम – रेल्वेने स्नॅक आणि अन्य खाण्याच्या प्रोडक्टबाबत नियम तयार केले आहे. तुमच्याकडून अतिरिक्त पैसे चार्ज करू शकत नाही. त्याचबरोबर खाण्याची गुणवत्ताही चांगली असणं गरजेचं आहे.

ट्रेनमधून प्रवास करताना सामानाचे नियम – एसी डब्ब्यात 70 किलो, स्लीपर कोचमध्ये 40 किलो आणि सेकंड क्लासमध्ये 35 किलो वजन नेण्याची परवानगी आहे. अतिरिक्त पैसे भरून एसीमध्ये 150 किलो, स्लीपरमध्ये 80 किलो आणि सेकंड क्लासमध्ये 70 किलो वजन नेण्याची परवानगी आहे.

प्रवासादरम्यान प्रवास वाढवू शकता का? – जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करताना आणखी पुढे जायचं असेल तर तुम्ही तुमचा प्रवास वाढवू शकता. यासाठी तुम्हाला टीटीई सोबत संपर्क साधवा लागेल किंवा आयआरसीटीसीवरून तिकीट बूक करू शकता. पण तुम्हाला दुसरी सीट दिली जाईल.

ट्रेन सुटल्यानंतर सीट सुरक्षित राहते? – तुम्ही बुकिंग केलेली ट्रेन वेळेत न पोहोचल्याने सुटली आणि दुसऱ्या स्टेशनवर जाऊन पकडण्याची सुविधा असेल तर यासाठी नियम आहे. ट्रेन दोन स्टेशन किंवा 1 तासाच्या आत असेल तर तुमची सीट कुणालाही दिली जात नाही. त्यानंतर टीटीई कुणालातरी देऊ शकतो.

वेटिंग तिकीटवर प्रवासाचा नियम – तुम्ही तिकीट काउंटरवरून वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करू शकता. पण ई तिकीट वेटिंग लिस्टवरून प्रवास करण्याची परवानगी नाही.

चेन पुलिंग – जर तुम्ही काही कारणास्तव ट्रेनमधील चेन पुल करता तुम्हाला दंड किंवा जेल होऊ शकते. त्यामुळे आपातकालीन स्थितीतच ट्रेनची चेन पुलिंग करावी.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.