Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध

शुक्रवारी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या सुरक्षित कर्जदात्यांनी रिलायन्स सोबतच्या विलिनीकरणाला नकार दर्शविला आहे. किमान 75 टक्के कर्जदात्यांची व्यवहारासाठी सहमती आवश्यक होती. मात्र, तब्बल 69.29 टक्के कर्जदात्यांनी प्रस्तावाला नकार दर्शवला आहे.

Reliance : रिलायन्स-फ्यूचर डील रद्द, 24 हजार कोटींचा व्यवहार बासनात; बँकाचा विरोध
relianceImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:32 PM

नवी दिल्ली : रिलायन्स (Reliance) आणि फ्यूचर ग्रुप दरम्यानचा व्यवहार करार फिस्कटला आहे. कर्जदात्यांनी प्रस्ताव नामंजूर केल्यामुळे 24 हजार कोटींचा व्यवहार करार बासनात गुंडाळण्याची वेळ आली आहे. रिलायन्सने फ्यूचर रिटेलसोबत (FUTURE RETAIL) करार होऊ शकत नसल्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या सुरक्षित कर्जदात्यांनी रिलायन्स सोबतच्या विलिनीकरणाला नकार दर्शविला आहे. किमान 75 टक्के कर्जदात्यांची व्यवहारासाठी सहमती आवश्यक होती. मात्र, तब्बल 69.29 टक्के कर्जदात्यांनी प्रस्तावाला नकार दर्शवला आहे. तर 30.71 टक्के कर्जदात्यांनी सहमती दर्शविली आहे. फ्यूचर समुहातील काही कंपन्यांनी चालू आठवड्यात शेअरधारक, कर्जदाते यांची बैठक बोलाविली होती. रिलायन्स (RELIANCE GROUP) सोबतच्या विलिनीकरणात्या व्यवहारांवर शिक्कामोर्तब करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

24 हजार कोटींचा करार

ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने आपला व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विकण्यासाठी 24,713 कोटी रुपयांचा करार केला होता. मात्र, या कराराला अॅमेझॉनने कायदेशीर आव्हान दिले होते. पण अलीकडेच रिलायन्सने कंपनीची वेगवेगळी स्टोअर्स ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. फ्यूचरने 20 एप्रिल रोजी भागधारकांची बैठक बोलावली होती. रिलायन्सला आपला व्यवसाय विकण्यासाठी तर सुरक्षित कर्जदार आणि असुरक्षित कर्जदारांची संमती घेण्यासाठी प्रस्ताव विचारविनिमयासाठी ठेवला होता.

ई-व्होटिंग प्रक्रिया

नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (NCLT) मुंबई खंडपीठाच्या आदेशानुसार FRLने 20 एप्रिल रोजी इक्विटी समभागधारकांची बैठक बोलावली. भागधारकांची ई-व्होटिंग प्रक्रिया शनिवारी सुरू झाली, ती मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ण केली.

बँका प्रतिकूल

स्थानिक बँकांचा रिलायन्स-फ्यूचरला कौल नसल्याचं चित्र दिसून आलं. कंपनीला कर्ज देणाऱ्या स्थानिक बँका बैठकीत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, स्टेट बँकेचे अधिकारी सहभागी झाले होते. यातील बहुतांश बँका रिलायन्स-फ्यूचर डील साठी अनुकूल नाहीत.

इतर बातम्या

Special Report | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?

Video : हैदराबाद सनरायजर्स नऊ विकेट्सने विजयी, अभिषेक वर्माची जोरदार फलंदाजी

Special Report | ‘मातोश्री’ऐवजी पोलीस स्टेशनमध्ये Rana दाम्पत्याची रवानगी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.