Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात आता मोठा बदल..रोज थांबावे लागेल अर्धा तास जास्त..कारण काय?

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आता वाढणार आहे..

Bank : बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात आता मोठा बदल..रोज थांबावे लागेल अर्धा तास जास्त..कारण काय?
कामाचे तास वाढणारImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 5:07 PM

नवी दिल्ली : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Employees) रोजच्या तासात आता बदल होणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात (Working Hour) बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांना रोज अर्धा तास (Half Hour) अधिक थांबावे लागणार आहे. त्यामागे कर्मचाऱ्यांचा फायदा आहे..

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाने (All India Bank Employees Association) इंडियन बँक असोसिएशनला एक पत्र पाठविले आहे. त्यात कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढविण्याचा मुद्दा समोर आला आहे.

कर्मचारी आठवड्यातील दोन दिवस सुट्टी मिळण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर कामाच्या वेळापत्रकात बदल करत प्रत्येक दिवशी 30 मिनिटे त्यांना अधिक काम करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांनी ही त्यासाठी होकार भरला आहे.

हे सुद्धा वाचा

या नवीन प्रस्तावानुसार, कर्मचाऱ्यांना आता सध्याच्या वेळेपूर्वी बँकेत अर्धा तास अगोदर हजर रहावे लागेल. तसेच कस्टमर केअर सर्व्हिस अथवा नॉन कॅश ट्रॉन्झक्शनसाठी प्रत्येक दिवशी अतिरिक्त 30 मिनिटे अधिक द्यावे लागतील.

या योजनेनुसार, बँका आता सकाळी 9.45 ऐवजी 9.15 वाजता सुरु होणार आहेत. तर बँक बंद होण्याची वेळ आता 4.45 अशी असेल. या काळात बँकेचे कामकाज सुरु राहील. ग्राहकांना आता सकाळी लवकर बँकेतील व्यवहार पूर्ण करता येतील.

भारतीय बँक संघाने अद्याप या निर्णयाला मंजुरी दिली नाही. परंतु, भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर झाल्यानंतर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे.

प्रश्न शनिवारच्या कामाचा आहे. महिन्यातील दोन शनिवार बँका बंद असतात. तर दोन शनिवार कामकाज सुरु असते. त्यादिवशीचा मुद्दा सोडविण्यात आला तर लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ बदलणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.