AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan EMI : रेपो दर जैसे थे, मग ईएमआय किती घटणार

Loan EMI : रेपो दर नुकताच जाहीर झाला. त्यात कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे ईएमआय किती घटणार?

Loan EMI : रेपो दर जैसे थे, मग ईएमआय किती घटणार
| Updated on: Jun 10, 2023 | 4:27 PM
Share

नवी दिल्ली : 8 जून रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर जाहीर केला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (ShaktiKant Das) यांनी पतधोरण समितीच्या (MPC) बैठकीतील निकाल, रेपो दराचे धोरण जाहीर केले. त्यांनी रेपो दर पूर्वीसारखाच 6.5 टक्के ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा दिल्याची चर्चा रंगली आहे. पण प्रत्यक्षात काय फरक पडला हे कर्जदारांना दिसून येईल. रेपो दर (Repo Rate) न वाढविल्याबद्दल कर्जदार आरबीआयचे जाहीर आभार मानत आहेत.

तुमचा ईएमआय बदलणार का भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तरीही तुमच्या कर्जाचा ईएमआय कमी अथवा जास्त होऊ शकतो. रेपो दराच्या आधारे देशातील व्यावसायिक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना आरबीआयकडून कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. त्याआधारे या बँका ईएमआयमध्ये बदल करतात.

असं आहे गणित गृहित धरा की, तुम्ही 8.60 टक्क्यांनी गृहकर्ज घेतले आहे. या व्याजदराने 20 वर्षांसाठी 20 लाख, 30 लाख वा 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावर (Home Loan) कसा फरक पडेल, हे पाहुयात. जर तुम्ही 20 वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल तर 8.60 टक्के व्याजदराने तुम्हाला मासिक 17483 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. तुम्ही यापेक्षा अधिक रक्कमेचे कर्ज घेतले असेल तरी तुमच्या ईएमआयमध्ये सध्या कुठलाच बदल होणार नाही. म्हणजे आरबीआयच्या सलग दुसऱ्या, रेपो दर न वाढविण्याच्या निर्णयाचा तुम्हाला काहीच फायदा झालेला नाही.

सहावेळा झाला बदल व्याज दरात वाढ करण्याची सुरुवात गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. रिझर्व्ह बँकेने एमपीसीने आपत्कालीन बैठक बोलावली होती. मे 2022 मध्ये आरबीआयने मोठ्या कालावधीनंतर रेपो दरात बदल केला होता. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत 6 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्यामुळे रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला.

असा बसला फटका गेल्या वर्षभरात ग्राहकांवर होमलोनचा भार सातत्याने वाढत आहे. त्यांच्यावर दोन प्रकारे दडपण आले आहे. काही बँकांनी प्रत्येक महिन्याच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल केला नाही. बँकांनी कर्जाचा कालावधी वाढविला आहे. बँकांनी कर्जावरील व्याज वाढविले. त्यामुळे प्रत्येक महिन्याचा ईएमआयवरील 1000 रुपये वाढतील. याचा अर्थ तुम्हाला 180 महिने ईएमआय आणखी चुकता करावा लागेल. हा कालावधी पुढे 5 ते 6 वर्षांकरीता वाढेल.

आशेचा किरण बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यानुसार, गुलाबी नोटा अशाच जमा होत राहिल्या तर लवकरच गृहकर्जावर स्वस्त होऊ शकते. सण, उत्सवावर ऑफर आणत बँका स्वस्तात गृहकर्ज देतील. बँका व्याजदरात सर्वसाधारणपणे 1.25 ते 2.25 टक्के कपात करण्याची शक्यता आहे. येत्या दिवाळीपर्यंत हा परिणाम दिसून येईल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.