LIC Policy | झटपट सुरु करा LIC ची लॅप्स पॉलिसी, इतक्या हजारांची मिळणार सवलत

LIC Policy | तुमच्याकडे असलेली एलआयसीची पॉलिसी बंद झाली आहे का? हप्ता वेळेत न भरल्याने ही पॉलिसी लॅप्स झाली आहे का? तर ही पॉलिसी तुम्हाला पुन्हा सुरु करता येणार आहे. एलआयसीने ग्राहकांना त्यांची बंद पॉलिसी सुरु करण्याची संधी दिली आहे. विशेष म्हणजे एलआयसी त्यासाठी काही हजारांची सवलत पण देत आहे.

LIC Policy | झटपट सुरु करा LIC ची लॅप्स पॉलिसी, इतक्या हजारांची मिळणार सवलत
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 5:41 PM

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : अनेकदा आपण उत्साहात भारतीय जीवन विमा महामंडळाकडून विमा (LIC Policy) खरेदी करतो. पण आर्थिक अडचण, पैशांची चणचण, आकस्मिक खर्चामुळे ही पॉलिसी बंद होते. नंतर ती सुरु करण्याची इच्छा नसते वा त्याचा विसर पडतो. आता तुम्हाला ही बंद पडलेली पॉलिसी सुरु करता येणार आहे. लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची संधी एलआयसीने दिली आहे. ग्राहकांना पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी काही खास सवलत पण देण्यात येणार आहे. पण त्यासाठी फार मोठा कालावधी उरलेला नाही. ग्राहकांना या महिन्यातच हे काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यांच्या हातात जवळपास 10 दिवस उरले आहेत.

विशेष मोहिम सुरु

हे सुद्धा वाचा

एलआयसीने यावेळी लॅप्स पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी एक विशेष मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे. या मोहिमेनुसार, एलआयसी ग्राहक आरोग्य विमा योजना सुरु करु शकतात. त्यावर 4,000 रुपयांपर्यंत रक्कम बचत पण करु शकतात.

काय आहे लॅप्स पॉलिसी

एलआयसीची कोणती पण विमा योजना ही कमीत कमी 3 वर्षांपर्यंत सुरु ठेवणे आवश्यक आहे. या पॉलिसीचे नुतनीकरण केले नाही तर ही पॉलिसी लॅप्स होते. प्रत्येक पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी ड्यू डेट नंतर ही ग्राहकांना एक अतिरिक्त कालावधी देण्यात येतो. या कालावधीत विमाधारकाने हप्ता जमा केला नाही तर त्याची विमा पॉलिसी लॅप्स होते. थकलेली रक्कम आणि विलंब शुल्क, व्याज भरुन ही पॉलिसी ग्राहकाला सुरु करता येते. त्यासाठी एलआयसी वेळोवेळी मोहिम राबविते.

बंद पॉलिसी सुरु करण्यासाठी मोठी सवलत

एलआयसीने बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्यासाठी एक विशेष मोहिम राबवली आहे. यामध्ये विलंब शुल्कावर 30 टक्क्यांची सवलत मिळत आहे. या पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या प्रीमियमनुसार ग्राहकांना वेगवेगळी सवलत मिळते. त्यामुळे ग्राहकांना पॉलिसी सुरु करताना थोडीफार मदत मिळते. पॉलिसी सुरु ठेवल्यास त्याला भविष्यातील लाभ लागू होतात.

बंद पडलेल्या पॉलिसीवर सूट

  • तुमची थकीत रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला विलंब शुल्कावर 30% सवलत मिळेल. ही सवलत रक्कम जास्तीत जास्त 3,000 रुपये आहे.
  • जर तुमचा एकूण थकीत प्रीमियम 1,00,001 ते 3,00,000 रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला विलंब शुल्कावर 30% म्हणजे जास्तीत जास्त 3,500 रुपयांची सूट मिळेल.
  • तुमच्या पॉलिसीची एकूण थकीत हप्ता 3,00,001 रुपये असेल तर विलंब शुल्कावर 30% म्हणजे जास्तीत जास्त 4,000 रुपयांची सवलत मिळेल.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.