किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला

Retail Inflation : कच्च्या तेलाचच्या आणि खाण्याच्या गोष्टी महागल्याचा परिणाम इतर गोष्टींच्या दरांवरही थेट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महागाई दर वाढत असल्याचं बोललं जातंय.

किरकोळ महागाईनं गेल्या 8 महिन्यांच्या रेकॉर्ड तोडला! वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचा खिसा फाडला
वाढत्या महागाईत चिंता वाढवणारी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 9:13 PM

मुंबई : आधी कोरोना महामारी (Corona Pandemic) आणि त्यानंतर सुरु असलेल्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला अधिकच कात्री बसू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation) हा 6.07 टक्के इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. हा आतापर्यंत गेल्या आठ महिन्यातला सर्वाधिक महागाईचा दर असल्याचं मसोर आलं आहे. आरबीआयनं (Reserve Bank of India) जारी केलेल्या महागाई स्तराच्या सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईनं गाठलेला स्तर हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरतोय. खाण्याच्या वस्तू महागल्या असून त्याचा परिणाम सर्वसामान्यांसोबतच सगळ्यांना बसू लागला आहे. सीपीआयच्या आधारे याबाबत अधिक स्पष्ट आकडेवारी जारी करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2021मध्ये किरकोळ महागाईचा दर हा 5.03 टक्के इतका होता. तर जानेवारी 2022 मध्ये हाच दर 6.01 टक्क्यांपर्यंत पोहोचला. दरम्यान, फेब्रुवारी महिन्यातही यात वाढ होऊन आता किरकोळ महागाई ही 6.07 टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई ही 13.11 टक्क्यांवर पोहोचली असल्याचं सरकारच्या डब्ल्यूपीआय डेटामधून समोर आलं. कच्च्या तेलाचच्या आणि खाण्याच्या गोष्टी महागल्याचा परिणाम इतर गोष्टींच्या दरांवरही थेट झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे महागाई दर वाढत असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, अल्पशा प्रमाणात खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट झाली असल्याचंही सांगितलं जातंय.

एनएसओतर्फे जारी करण्यात आलेल्या डेटानुसार खाद्यपदार्थांच्या किंमती या 5.89 टक्क्यांनी वाढल्या आहेत. महागाईचा हा जर जानेवारीच्य तुलनेत जास्त आहे. जानेवारीमध्ये 5.43 टक्क्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या होत्या.

कोणत्या गोष्टीमध्ये किती वाढ?

  1. धान्य 3.95 टक्क्यांनी महागलं
  2. मांस-मच्छी 7.54 टक्क्यांनी महाग
  3. भाज्या 6.13 टक्क्यांनी महाग
  4. मसाल्यांची 6.09 टक्क्यांनी दरवाढ
  5. फळांचा महागाई दर 2.26 टक्के
  6. तेल आणि इतर दराला अल्पसा दिलासा, महागाई दर 9.32 वरुन 8.73 टक्क्यांवर

सीपीआय म्हणजे काय?

सीपीआय म्हणजे कंझ्यूमर प्राई इंडेक्स. या द्वारे सामान आणि सेवेच्या किरकोळ बाजारातील किंमती नेमक्या किती आहे, त्यांचे दर किती वधारले आहेत किंवा घटले आहेत, याचा अभ्यास आणि त्यातील तुलना याद्वारे काढली जाते. आरबीआय अर्थव्यवस्थेत किंमती स्थिर ठेवण्यासाठी सीपीआयच्या आकड्यांचाही विचार करतं. सीपीआयमध्ये एका विशेष कमोडिटीसह किरकोळ बाजारातील किंमती काय आहेत, याचा आढावा घेतला जातो. शहरी, ग्रामीण आणि देशभरातील बाजारांतील किंमतींचे स्तर याचा अभ्यास या इंडेक्समध्ये केला जातो.

संबंधित बातम्या :

Maggie Price Hike : बच्चे कंपनीची आवडती मॅगी महागली, नवे दर लागू, वाढत्या महागाईचे चटके सुरुच

शेअर बाजारात 900 अंकांची वाढ, गुंतवणूकदारांच्या जिवात जीव! पण रुपयांचं मूल्य आणखी घसरल्यानं चिंता

कच्च्या तेलाच्या वाढत्या भावाचा प्रवाशांना फटका; विमान प्रवास महागला, तिकिटांच्या दरामध्ये 15 ते 30 टक्क्यांची वाढ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.