Rupee : एक रुपयाच्या नाण्यावर अंगठा तर दोन रुपयांच्या नाण्यावर दोन बोटं का? या चिन्हांचा अर्थ तरी काय? घ्या जाणून..

Rupee : नाण्यांवरच्या या खाणा-खुणा काय सांगतात..

Rupee : एक रुपयाच्या नाण्यावर अंगठा तर दोन रुपयांच्या नाण्यावर दोन बोटं का? या चिन्हांचा अर्थ तरी काय? घ्या जाणून..
चिन्हांचा अर्थ काय?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 06, 2022 | 10:23 PM

नवी दिल्ली : एक रुपयाच्या जून्या नाण्यावर (Coin) गव्हाच्या (wheat) ओबींचे चिन्ह होते. परंतु, आता जो नवीन रुपया आला आहे, त्यावर अंगठ्याचे चिन्ह (Symbol)आहे. परंतु, नवीन रुपयावर हे चिन्ह अंकित करण्याचे कारण तरी काय? एक रुपयासोबत इतर ही अनेक नाण्यावर चिन्ह आहेत. दोन रुपयांच्या नाण्यावर दोन बोटांचे चिन्ह अंकित आहे. पण ही चिन्ह रुपयांवर का अंकित करण्यात येतात, त्याची कारणं काय, याविषयी जाणून घेऊयात..

बाजारात एक आणि दोन रुपयांची नाणी जी चलनात आहेत. त्यांच्यावर हातांच्या बोटांची चिन्ह आहेत. हा सिम्बॉल केवळ डिझाईनसाठी नाही. त्यांचा खास अर्थ आहे. एक आणि दोन रुपयांच्या या नाण्यांवरील चिन्हांचा एक इतिहास आहे. त्यातून एक अर्थ ध्वनीत होतो.

एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांवर जी चिन्हं आहेत. ती भारतनाट्यमच्या नृत्याच्या मुद्रा आहेत. ही चिन्ह यासाठी तयार करण्यात आली आहे की, अंधांना या रुपयाला हात लावल्यानंतर त्याविषयी माहिती मिळेल.  त्यांना या चिन्हावर बोटं फिरवल्यारव नाण्याचा अंदाज बांधता येतो.

हे सुद्धा वाचा

त्यामुळेच एक रुपयाच्या नाण्यावर थम्सअप आणि दोन रुपयांच्या नाण्यावर टू फिंगर्स हे चिन्ह आहेत. त्यामुळे अंध व्यक्तीला त्याला हात लावताच त्या नाण्याचा अर्थबोध होतो. तसेच त्याचे मूल्य ही कळते. म्हणजे ते नाणे किती रुपयाचे आहे याची माहिती मिळते.

बोटांचे चिन्ह असणारी ही एक आणि दोन रुपयांची नाणी बाजारात 2007 साली आली होती. त्यापूर्वी एक रुपयाच्या नाण्यावर गव्हाच्या ओबींचे चिन्ह होते. तर इतर ही अनेक नाण्यांवर चिन्ह आहेत. या चिन्हावरुन हे नाणे कोठे तयार करण्यात आले याची माहिती मिळते.

ही नाणी टाकसाळीत तयार करण्यात येतात. टाकसाळ हा सरकारी कारखाना आहे, जिथे सरकारच्या आदेशाने आणि बाजाराच्या मागणीनुसार नाणी तयार करण्यात येतात. भारतात सध्या चार टाकसाळ आहेत. त्यात नोएडा, कोलकत्ता, मुंबई आणि हैदराबाद यांचा समावेश आहे.

या टाकसाळीनुसार ही चिन्हांचा अर्थ असतो. त्यावरुन ते नाणे कोणत्या टाकसाळीत तयार होते, याची माहिती मिळते. प्रत्यके टाकसाळीत वेगवेगळ्या चिन्हाची नाणी तयार होतात. या नाण्यामध्ये खालच्या बाजूला एक आकृती असते, ती त्या टाकसाळीची माहिती देते.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...