थंडीत गिझर वापरताना ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा होईल अपघात

थंडीत गरम पाण्याने अंघोळ करण्याची मजा वेगळीच असते. गरम पाण्यासाठी गिझरचा वापर करतात. पण गिझर वापरताना खूप खबरदारी घ्यावी लागते. अनेकदा गिझरमुळे अपघातही होतो. म्हणूनच गिझर वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेऊया.

थंडीत गिझर वापरताना 'हे' लक्षात ठेवा, अन्यथा होईल अपघात
गीझर वापरताना ही घ्या काळजी
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 2:54 PM

हिवाळयात दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतात थंडी जास्त असते. तसेच त्या ठिकाणी थंडीचा ओघ झपाट्याने वाढत असतो.पण यंदा थंडी येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागला, मात्र आता या नोव्हेंबर महिन्यात लोकांना थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या या दिवसात अनेक लोकांना थंड पाण्याने अंघोळ करायची सवय असते. अश्या लोकांना हिवाळ्यात थंडी वाढल्याने गरम पाणी वापरावे लागते.  पण गिझर वापरताना खूप खबरदारी घ्यावी लागते. अनेकदा  गिझरमुळे अपघातही झाल्याची उदाहरणं समोर आहेत. म्हणूनच गिझर वापरताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया.

गिझर जास्त वेळ चालू ठेवू नका

थंडीच्या दिवसात तुम्ही गिझर चालू करून काही मिनिटांतच गरम पाणी येऊन येतं. जेणेकरून तुम्ही सहज आंघोळ करू शकाल. पण अनेकदा गिझर चालू केल्यानंतर काही लोकं बराच वेळ बंद करत नाहीत. आणि गिझर चालू राहतो. अशा प्रकरणांमध्ये हे दिसून आले आहे. काही वेळा गिझरचा स्फोटही होतो. म्हणूनच जेव्हा तुम्ही गीझर वापरता. तेव्हा गिझर जास्त वेळा चालू राहणार नाही याची खबरदारी घ्या. गिझर बंद करणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्टिफाइड कंपनीकडूनच गिझर खरेदी करा

अनेकदा लोकं काही पैसे वाचवण्यासाठी स्वस्त गिझर विकत घेतात. ज्यामुळे पुढे त्यांच्यासाठी खूप धोक्याचे असू शकत. कारण अनेकदा स्थानिक कंपन्यांच्या गिझरमध्ये सुरक्षिततेच्या निकषाची काळजी घेतली जात नाही. आणि असे गिझर खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि अपघात होण्याची भीतीही असते. म्हणूनच गिझर विकत घेताना तुम्ही सर्टिफाइड कंपनीचे गिझर घेत आहात की नाही हे तपासा.

बाथरूममध्ये वरच्या भागात गिझर बसवा

बाथरूममध्ये योग्य ठिकाणी गिझर बसवणं खूप गरजेचं आहे. कारण गिझरचे होणारे अपघात अनेकदा गिझरमध्ये पाणी पडल्याने घडतात. म्हणूनच तुम्ही बाथरूममध्ये वरच्या भागावर गिझर बसावा जिथे पाणी जाऊ शकत नाही.

Non Stop LIVE Update
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा
मनसेनं 'खुर्ची' टाकली, संजय राऊत 'खाट' टाकणार, राज ठाकरेंवर निशाणा.