नवी दिल्ली | 4 ऑगस्ट 2023 : सहारा कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या हजारो गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. सहारा गुंतवणूकदारांना अनेक वर्षांनी दिलासा मिळाला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी 112 नागरिकांच्या खात्यात 10,000 रुपयांचा पहिला हप्ता ट्रान्सफर केला आहे. अमित शाह यांनी यावेळी सांगितले की सहारा क्लेम पोर्टलवर जवळपास 18 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. सहारा कंपनीच्या अनेक योजनांमध्ये लाखो गुंतवणूकादांचा पैसा अडकला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकार गुंतवणूकदारांचा पैसा टप्पाटप्प्याने परत करणार आहे.
सहारा क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड, सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी लिमिटेड, हमारा इंडीया क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड आणि स्टार मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये लाखो गुंतवणूकदारांनी आपल्या घामाचा पैसा गुंतवला आहे. सहारा कंपनी दिवाळखोरीत गेल्यानंतर अनेक गुंतवणूकदार देशोधडीला लागले आहेत.
अमित शाह यांचे ट्वीट पाहा –
#WATCH | Union Home and Cooperative Minister Amit Shah transfers the claim amount to the depositors of cooperative societies of the Sahara group through the Sahara Refund Portal in Delhi pic.twitter.com/Hmfm9IqPMP
— ANI (@ANI) August 4, 2023
आता सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या कंपनीच्या अनेक योजनांमध्ये आपली आयुष्याची जमापुंजी गुंतवणाऱ्या नागरिकांचे पैसे परत करीत आहे. सरकार सुरुवातीला 5000 कोटीचा रक्कम नागरिकांना परत करणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अलिकडेच यासाठी सहारा पोर्टल लॉंच केले आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की सरकार 1 कोटी गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार आहे. अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत सरकार पैसे गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करणार आहे.
1 – गुंतवणूकदारांनी आधी https://mocrefund.crcs.gov.in/ वर लॉगिन करावे लागेल
2 – गुंतवणूकदाराला जमाकर्ता नोंदणीच्या पर्यायाची निवड करावी लागेल
3 – आता तुमच्याकडे आधारकार्ड नंबर आणि त्याच्याशी कनेक्टेड मोबाईल क्रमांक मागितला जाईल
4 – एक ओटीपी तुमच्या आधारकार्ड संलग्न मोबाईल क्र.वर येईल
5 – रजिस्ट्रेशन प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर जमाकर्ता लॉगिनच्या पर्यायाकडे जावे
6 – त्यानंतर आधारकार्डचे शेवटचे चार आकडे आणि मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी जनरेट करावा आणि त्याला भरावा
7 – त्यानंतर मी सहमत आहे वर क्लिक करावे, येथे तुम्हाला बॅंक डीटेल्स आणि जन्म तिथी येईल
8 – आपल्या पावतीसह क्लेम फॉर्म भरुन बचत सोसायटीचे डीटेल्स भरावेत
9 – योग्य डीटेल्स भरल्यावर तुम्हाला पोर्टलवर क्लेम लेटर डाऊनलोड करावे लागेल. यावर स्वत:चा एक पासपोर्ट साईज फोटा चिकटवून सही करावी
10 – त्यानंतर ते लेटर अपलोड करावे, प्रक्रिया पूर्ण होताच रजिस्टर मोबोईल क्रमांकवर तुम्हाला मॅसेज येईल