Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Fastag | फास्टॅग खात्यातील बॅलन्स चेक करा..केवळ एका एसएमएसवर..

SBI FASTag | SBI ने फास्टॅग ग्राहकांना खात्यातील बॅलन्स चेक करण्यासाठी खास सुविधा सुरु केली आहे. एका एसएमएसवर ग्राहकांना त्यांच्या खात्यातील रक्कम तपासता येणार आहे.

SBI Fastag | फास्टॅग खात्यातील बॅलन्स चेक करा..केवळ एका एसएमएसवर..
एसबीआय फास्टॅगचं बॅलन्स असं तपासाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 10:27 AM

SBI FASTag | स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फास्टॅग ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे. बऱ्याचदा टोलनाक्यावर पोहचल्यावर फास्टॅगमध्ये (FASTag)रक्कम शिल्लकच नसल्याचे समोर येते. अशावेळी ग्राहकांना एका एसएमएसवर (SMS) त्यांच्या फास्टॅग खात्यातील रक्कमेची माहिती अचूक मिळणार आहे.

नोंदणीकृत क्रमांकावर मिळेल सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना या सुविधेची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, एसबीआय ग्राहकांनी त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन 7208820019 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. ग्राहकांना लागलीच त्यांच्या फास्टॅग खात्यातील शिल्लक रक्कमेची माहिती मिळेल.

असा करा SBI FASTag मॅसेज

स्टेट बँकच्या ट्विटनुसार,एसबीआय फास्टॅग ग्राहकांनी त्यांच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरुन FTBAL असे लिहून 7208820019 या क्रमांकावर पाठवावे. त्यानंतर काही सेकंदात त्यांना फास्टॅगच्या बॅलन्सची माहिती मिळेल.

हे सुद्धा वाचा

काय आहे फास्टॅग

फास्टॅग एक रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आरएफआयडी या तंत्रज्ञानावर आधारीत डिवाईस आहे. या तंत्रज्ञानाआधारे टोलनाक्यावर आपोआप टोल जमा करण्यात येतो.

कधीपासून फास्टॅगचा वापर सुरु

फास्टॅगचे स्टीकर गाड्यांच्या दर्शनी भागावर चिटकवलेले असते. 15 जानेवारी 2020 रोजीपासून खासगी आणि व्यावसायिक वाहनधारकांना फास्टॅग बंधनकारक करण्यात आले आहे.

खात्यातून रक्कम होते कपात

फास्टॅग एक प्रीपेड पेमेंट पद्धत आहे. ही पेमेंट सेवा ग्राहकाच्या बचत खात्याशी संलग्नीत असते. त्यामुळे टोल नाक्यावर रीडर, वाहनावरील स्टीकर रीड करते आणि तुमच्या खात्यातून रक्कम आपोआप कपात होते.

SBI फास्टॅग कसे घेणार

जर तुम्ही एसबीआयचा फास्टॅग घेऊ इच्छित असाल तर , तुम्हाला 1800110018 या कस्टमर केअर क्रमांकवर संपर्क करावा लागेल. एसबीआय फास्टॅग पीओएस लोकेशनची तुम्हाला माहिती देण्यात येईल. तसेच तुम्ही ई-कॉमर्स संकेतस्थळावरुन ही SBI फास्टॅग खरेदी करता येईल.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.