Marathi News Utility news SBI Home Loan: Big gift from SBI to customers Loans at just 6.65 per cent interest special discounts for women
SBI Home Loan: एसबीआयकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट; अवघ्या 6.65 टक्के व्याजदराने मिळतंय कर्ज, महिलांना विशेष सूट
होम लोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Home Loan) स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना अवघ्या 6.65 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे.
1 / 5
होम लोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Home Loan) स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देत आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना अवघ्या 6.65 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. गृहकर्जाबाबत एसबीआयच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये एसबीआय रेग्युलर होम लोन, होम लोनचे बॅलन्स ट्रान्सफर, एनआरआय होम लोन, फ्लेक्सिपे होम लोन, प्रिव्हिलेज होम लोन, शौर्य होम लोन, पूर्व मंजूर गृह कर्ज, रियल्टी होम लोन, होम टॉपअप कर्ज आणि एसबीआय स्मार्ट होम टॉपअपचा समावेश आहे.
2 / 5
एसबीआय बँक ही भारतातील सर्वात मोठी होम लोन कर्जदाता बँक आहे. बँकेचा व्याजदर हा रेपो रेटशी संबंधित असतो. रेपो रेट वाढल्यास व्याज दरात वाढ होते, रेपो रेट कमी झाल्यास व्याज देखील कमी होते.
3 / 5
एसबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार सध्या ग्राहकांना 6.65 टक्के व्याजदराने होम लोन मिळत आहे. मात्र जर घरातील महिलेच्या नावाने कर्ज घेतल्यास त्यामध्ये आणखी 5 बेसिस पॉइंटची सूट देण्यात येत आहे. जर तुमचे एसबीआयमध्ये सॅलरी खाते असेलत तर तुमच्या लोनचा समावेश हा बँकेच्या शौर्य स्कीम अंतर्गत करण्यात येतो. या योजनेत तुम्हाला व्याजदरात आणखी पाच बेसिस पॉइंटची स्पेशल ऑफर मिळते. समजा जर एसबीआय 6.65 टक्के व्याजदराने कर्ज देत असेल तर तुम्हाला ते 6.60 टक्के दरानेच कर्ज मिळते.
4 / 5
जर तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला गॅरंटरची आवश्यकता नसते. तसेच तुम्हाला जर लोन प्री- क्लोज करायचे असेल तर तुम्हाला फी लागत नाही. तुमचा सीबील स्कोर बघून कर्जाची रक्कम ठरवली जाते.
5 / 5
कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, आयडी प्रूफ यासारखे अत्यावश्यक कागदपत्र बँकेकडून मागवली जातात. तुम्ही कागदपत्र सादर केल्यानंतर तुमचा सीबील स्कोर चेक होतो. तुमचा सीबील स्कोर पाहून तुम्हाला कर्ज दिले जाते.