Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI interest Rate : होमलोनचा हप्ता वाढणार! सलग दुसऱ्यांदा SBIने व्याजदर वाढवले, नवे व्याजदर काय?

SBI Home loan EMI : आता किमान व्याजदर हा 6.85 टक्के तर कमाल व्याजदर हा 7.5 टक्के असणार आहे. ओव्हरसाईट लोनसाठी एमसीएलआर 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के करण्यात आला आहे

SBI interest Rate : होमलोनचा हप्ता वाढणार! सलग दुसऱ्यांदा SBIने व्याजदर वाढवले, नवे व्याजदर काय?
कामाची बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 11:48 AM

मुंबई : आरबीआयनं रेपो रेट (RBI Repo Rate) वाढवल्यानंतर बहुतांश बँकांनी व्याजदरात (Bank interest Rate) वाढ केली. यामध्ये एसबीआयचाही समावेश होता. दरम्यान, आता एसबीआयकडून (State Bank of India SBI) दुसऱ्यांदा व्याजदर वाढवण्यात आलेत. 10 बेसिक पॉईन्टने एसबीआयनं व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदरातील ही वाढ मार्जिनल कॉस्ट आणि लँन्डिंग रेस्टवर लागू असणार आहे. नवे दर तत्काळ लागूदेखील करण्यात आलेत. याआधी एप्रिल महिन्यात एसबीआय बँकेनं एमसीएलआरमध्ये वाढ केली होती. एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक पार पडली होती. तेव्हा देखील एमसीएलआर मध्ये 10 बेसिक पॉईन्टची वाढ करण्यात आली होती. मॉनिटरी पॉलिसी बैठकीत रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईट्स वाढवून 4.4 टक्के इतका करण्यात आला होता.

आता कसे असतील व्याजदर?

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या माहितीनुसार, आता किमान व्याजदर हा 6.85 टक्के तर कमाल व्याजदर हा 7.5 टक्के असणार आहे. ओव्हरनाईट लोनसाठी एमसीएलआर 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्यासाठी एमसीएलआर आता 6.85 टक्के, तीन महिन्यांसाठी 6.85 टक्के, सहा महिन्यांसाठी 7.15 टक्के, एका वर्षासाठी 7.20 टक्के, दोन वर्षांसाठी 7.40 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.50 टक्के करण्यात आला आहे.

जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

SBI EMI

नवे व्याजदर

 कमी व्याजदरात कर्ज नाहीच…

मार्जिनल कॉस्ट ऑफ लॅन्डिंग म्हणजे तो व्याजदर, ज्यापेक्षा कमी दरात कर्ज मंजूर केलं जात नाही. ऑक्टोबर 2019च्या आधी घेण्यात आलेल्या लोनसाठी ही एक प्रकारची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. बिझनेस लोहनसह हम लोन दोघांनाही हे व्याजदर लाहू आहेत. याआधी लोन घेतलेल्यांचे एएमआय आता वाढवण्यात आलेल्या व्याजदरामुळे वाढणार आहेत.

हे सुद्धा वाचा

होमलोनचा इएमआय 0.40 टक्क्यांनी वाढला…

ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी गृहकर्ज घेतलंय, त्यांचा व्याजदर हा थेट रेपो रेटशी जोडलेला असतो. गेल्या काही दिवसांत आरबीआयनं 40 बेसिक पॉईंट्सने रेपो रेटमध्ये वाढ केली होती. त्याचा थेट परिणाम कर्जावर होताना पाहायला मिळतोय. RPLR आधारीत लोनचा इएमआय आता 0.40 टक्के वाढलाय.

दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?
दादांच्या बीड दौऱ्याला दांडी अन् फॅशन शोला हजेरी, बघा नेमकं काय खरं?.
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.