SBI बँकेच्या योजनेत पैसे गुंतवा आणि घसघशीत व्याज मिळवा

| Updated on: Sep 11, 2021 | 12:21 PM

SBI Bank | 15 ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या या योजनेचा कालावधी 14 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे Platinum Deposits Scheme स्कीममध्ये पैसे गुंतवण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगळा व्याजदर मिळत आहे.

SBI बँकेच्या योजनेत पैसे गुंतवा आणि घसघशीत व्याज मिळवा
एसबीआय
Follow us on

मुंबई: भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना सुरु करण्यात आली होती. Platinum Deposits Scheme असे नाव असलेल्या योजनेतील ठेवींवर 6.20 टक्के इतके व्याज दिले जात आहे. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एसबीआय बँकेने ही विशेष योजना सुरु केली होती. 15 ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या या योजनेचा कालावधी 14 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे Platinum Deposits Scheme स्कीममध्ये पैसे गुंतवण्यासाठी आता फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगळा व्याजदर मिळत आहे.

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 75 दिवस

सध्याचा दर- 3.90 टक्के
प्रस्तावित दर- 3.95 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 525 दिवस

सध्याचा दर- 5 टक्के
प्रस्तावित दर- 5.10 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना- 2250 दिवस

सध्याचा दर- 5.40 टक्के
प्रस्तावित दर- 5.55 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 75 दिवस

सध्याचा दर- 4.40 टक्के
प्रस्तावित दर- 4.45 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 525दिवस

सध्याचा दर- 5.50 टक्के
प्रस्तावित दर- 5.60 टक्के

प्ल्रॅटिनम डिपॉझिट योजना (ज्येष्ठ नागरिक) 2250 दिवस

या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 6.20 टक्के इतका व्याजदर दिला जात आहे.

डेबिट कार्डवरून जास्त पैसे खर्च केले, मग रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करा

नेकदा शॉपिंगला गेल्यावर वस्तू खरेदी करण्याच्या नादात आपल्याला नेमक्या खर्चाचा अंदाज येत नाही. पण बिलिंग काऊंटरवर गेल्यानंतर आपण प्रमाणापेक्षा जास्त खर्च केला असे लक्षात येते. तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर पैसे तात्काळ भरावे लागतात. परंतु, त्यामुळे पुढील खर्चाचा ताळमेळ बिघडण्याची भीती असते.

अशावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या डेबिट कार्डधारकांना खास सोय देऊ केली आहे. त्यानुसार ग्राहक डेबिट कार्डवरून पूर्ण पैसे खर्च न करता ती रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट करु शकता. ग्राहकपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्ही डेबिट कार्ड स्वाईप केल्यानंतर तुम्ही ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, Amazon किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी करतानाही तुम्हाला या विशेष सुविधेचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा काय?

स्टेट बँकेच्या डेबिट कार्डवर केलेल्या खर्चाची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट केल्यास तुम्हाला कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. तसेच यासाठी कोणतीही कागदपत्रे जमा करावी लागणार नाहीत. शॉपिंगची रक्कम EMI मध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर तुमच्या बचत खात्यामधील लिमीट पूर्ववत होईल.

इतर बातम्या:

महागडा मोबाईल, त्याचा विमा, नंतर क्लेम, पोलिसात तक्रारीचा कट आणि महिला अडचणीत

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार