Marathi News Utility news SBI will provide service on Whatsapp a savings account that can be opened at home registration process
SBI देणार Whatsapp वर सेवा, घरीच बसून उघडता येणार बचत खाते, असे करा रजिस्ट्रेशन
बँकेच्या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना इन्स्टंट मेसेजिंग ॲपद्वारे बँकिंग सेवांचा सर्वाधिक लाभ घेता येणार आहे. जेणेकरून छोट्या कामांसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. एसबीआयची व्हॉट्सॲप बँकिंग सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना प्रथम त्यांचे खाते नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया Image Credit source: Social Media
SBI Whatsapp Service: स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली व्हॉट्सॲप बँकिंग सेवा सुरू केली आहे. एसबीआयची व्हॉट्सॲप सेवा सुरू झाल्यानंतर, ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक (Account Balance) आणि शेवटच्या पाच व्यवहारांची माहितीसह मिनी स्टेटमेंट तपासू शकतील. बँकेच्या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना इन्स्टंट मेसेजिंग ॲपद्वारे बँकिंग सेवांचा सर्वाधिक लाभ घेता येणार आहे. जेणेकरून छोट्या कामांसाठी तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही. एसबीआयची व्हॉट्सॲप बँकिंग सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना प्रथम त्यांचे खाते नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.
असे करा रजिस्ट्रेशन
SBI WhatsApp बँकिंग सेवेमध्ये तुमचे बँक खाते नोंदणी करण्यासाठी WAREG A/C NO (+917208933148) वर MMS पाठवा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुम्ही SBI ची WhatsApp बँकिंग सेवा वापरू शकता.
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 19, 2022
WhatsApp बँकिंग सेवा कशा वापरायच्या
एकदा नोंदणी केल्यानंतर, +919022690226 या क्रमांकावर WhatsApp वर HI संदेश पाठवा.
खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा.
खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट
व्हॉट्सॲप बँकिंगमध्ये नोंदणी करा
घरीच बसून उघडा बचत खाते
स्टेट बँकेने ट्विट केले आहे की, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये Yono SBI ॲप डाउनलोड करून डिजिटल बचत खाते उघडू शकता. यासाठी तुम्हाला शाखेत जावे लागणार नाही. हे डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. हे बचत खाते उघडताना OTP आधारित प्रमाणीकरण सुविधा उपलब्ध आहे.
SBI चा ग्राहक वर्ग प्रचंड मोठा आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि नवीन घरच जोडण्यासाठी बँकेकडून कायमच नवीन सेवा देण्याचा मानस असतो. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे.