एसबीआयचा नवा नियम; 1 जुलैपासून चार कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारणार, जाणून घ्या अधिक माहिती

बीएसबीडी खातेधारकांसाठी शाखांमध्ये, एटीएममध्ये, सीडीएममध्ये (कॅश डिस्पेन्सिंग मशीन) विना-आर्थिक व्यवहार आणि हस्तांतरण व्यवहार विनामूल्य असतील. (SBI's new rules; Charges will be levied after four cash withdrawals from 1 July)

एसबीआयचा नवा नियम; 1 जुलैपासून चार कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारणार, जाणून घ्या अधिक माहिती
1 जुलैपासून चार कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारणार
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 4:22 PM

नवी दिल्ली SBI Cash Withdrawal Charges : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय आता महिन्यात चार विनामूल्य कॅश विथड्रॉलनंतर मूलभूत बचत बँक ठेवी खातेधारकांकडून (BSBD Account holder) शुल्क आकारेल. या ग्राहकांकडून एका वर्षामध्ये 10 पानांपेक्षा अधिक पानी चेक बुकसाठी शुल्क आकारले जाईल. बीएसबीडी खात्यातील सेवा शुल्कामध्ये बदल केल्यानुसार 1 जुलैपासून या कामांसाठी बँक 15 ते 75 रुपये आकारेल. (SBI’s new rules; Charges will be levied after four cash withdrawals from 1 July)

बीएसबीडी खातेधारकांसाठी शाखांमध्ये, एटीएममध्ये, सीडीएममध्ये (कॅश डिस्पेन्सिंग मशीन) विना-आर्थिक व्यवहार आणि हस्तांतरण व्यवहार विनामूल्य असतील. अतिरिक्त जीएसटी असलेल्या शाखा, एसबीआय एटीएम किंवा इतर बँक एटीएममधून चार मोफत कॅश विथड्रॉलपेक्षा जास्त व्यवहारावर ते प्रति विथड्रॉलवर 15 रुपये शुल्क आकारेल, असे एसबीआयने म्हटले आहे. एसबीआयने म्हटले आहे की, एटीएम आणि शाखेतून चार मोफत कॅश विथड्रॉलनंतर शुल्क आकारले जाईल.

आर्थिक वर्षात फक्त 10 चेकबुक विनामूल्य

आर्थिक वर्षात फक्त 10 चेकबुक विनामूल्य असतील. तसेच चेक बुक सेवेसाठी एका आर्थिक वर्षात प्रथम 10 धनादेश विनामूल्य दिले जातील आणि त्यानंतर चेक बुकच्या 10 पानांसाठी 40 रुपये शुल्क व 25 पानांसाठी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. यासाठी जीएसटी वेगळा जोडला जाईल. एसबीआयने सांगितले की ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना चेकबुक सेवांवर सूट देण्यात आली आहे.

या शुल्कामधून एसबीआयने केली 300 कोटींची कमाई

बेसिक सेव्हिंग्ज अकाउंटवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत नुकताच एक धक्कादायक अहवाल आला होता. आयआयटी बॉम्बेने आपल्या अभ्यासात म्हटले होते की देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँका आणि काही मोठ्या बँका गरिबांच्या खात्यातून सेवांच्या नावाखाली कसे पैसे कमवत आहेत. अहवालानुसार एसबीआयने गेल्या सहा वर्षांत बीएसबीडी खातेदारांकडून शुल्क म्हणून 308 कोटी रुपये जमा केले आहेत. एसबीआयकडे 12 कोटी बीएसबीडी खातेधारक आहेत. पीएनबीकडे बीएसबीडी खातेदारांची संख्या 3.9 कोटी आहे. व्यवहार शुल्काच्या नावाखाली बँकेने त्यांच्याकडून 9.9 कोटी रुपये वसूल केले आहेत.

प्रत्येक व्यवहारासाठी एसबीआयकडून 17.70 रुपये शुल्क

अहवालात असे म्हटले होते की चार विनामूल्य व्यवहारानंतर एसबीआय प्रत्येक व्यवहारासाठी 17.70 रुपये घेते. बँकांकडून बीएसबीडीए खातेधारकांकडून शुल्क वसूल करण्याच्या निर्णयावर सप्टेंबर 2013 मध्ये आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम झाला. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, मूलभूत बचत खातेदारदेखील चारपेक्षा जास्त व्यवहार करू शकतात. चार मोफत व्यवहारानंतर शुल्क आकारायचे आहे की नाही हे बँकांच्या निर्णयावर अवलंबून आहे. (SBI’s new rules; Charges will be levied after four cash withdrawals from 1 July)

इतर बातम्या

Delta Plus Update : महाराष्ट्राला मोठा दिलासा, जळगावसह रत्नागिरीतील रुग्णांची डेल्टा प्लसवर मात

आरटीपीसीआर चाचण्यांबरोबरच लसीकरणाची गती वाढवा; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.