नवी दिल्ली : जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल आणि तुम्ही बँकेचे ऑनलाईन अॅप्लिकेशन YONO द्वारे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. एसबीआय ऑनलाईन सिस्टमच्या मेंटेनन्समुळे तुम्ही शुक्रवारी रात्री ऑनलाईन सुविधा वापरू शकणार नाही. बँकेने अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देत केव्हापासून आपण ऑनलाईन बँकिंग करू शकणार नाही, हे स्पष्ट केले आहे. (SBI’s online banking service will be down for a while, know exactly when)
वास्तविक, एसबीआय, तुम्हाला ऑनलाईन सेवांद्वारे बहुतेक सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. वेळोवेळी आपली ऑनलाईन सिस्टम देखील अपडेट करते आणि या देखभालीचे काम बँक करते. परंतु, मेंटेनन्स दरम्यान ग्राहक एसबीआयच्या ऑनलाईन बँकिंगचा वापर करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा आपण काही काळासाठी मेंटेनन्स कालावधीपर्यंत ऑनलाईन व्यवहार करू शकणार नाही.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मेंटेनन्सचे काम 6 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 22:45 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 1.15 वाजेपर्यंत चालेल. या 150 मिनिटांत तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरू शकत नाही.
बँकेने सांगितले की, मेंटेनन्स दरम्यान तुम्ही इंटरनेट बँकिंग, योनो(YONO), योनो लाइट(YONO Lite), योनो बिझनेस(Yono Business)द्वारे कोणताही व्यवहार करू शकणार नाही.
योनो लाईट हे इतर बँकांच्या सामान्य बँकिंग अॅप्लिकेशनप्रमाणे एक सामान्य अॅप्लिकेशन आहे. याद्वारे ऑनलाईन बँकिंग संबंधी काम करता येते. तथापि, या अॅप्लिकेशनद्वारे आपण आपल्या माहितीमध्ये काहीही संपादित करू शकत नाही. YONO SBI अॅप्लिकेशनला दोन्ही अॅप्लिकेशनची मोठी आवृत्ती म्हटले जाऊ शकते. तथापि, यामध्ये, या अॅप्लिकेशनद्वारे खरेदी वगैरे करता येते. या व्यतिरिक्त, आपण या अॅप्लिकेशनद्वारे खात्याची वैयक्तिक माहिती देखील एडिट करू शकता – जसे की आपण एसएमएस अलर्ट चालू किंवा बंद करू शकता किंवा इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड बदलू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक आहे. या बँकेच्या एकूण 22,000 पेक्षा जास्त शाखा, 57,889 एटीएम देशभरात उपलब्ध आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत एसबीआयच्या इंटरनेट बँकिंग ग्राहकांची संख्या 85 कोटी आणि मोबाईल बँकिंग वापरकर्त्यांची संख्या 19 कोटी आहे. डिसेंबर 2020 च्या शेवटी SBI च्या एकूण UPI वापरकर्त्यांची संख्या 135 कोटी होती. (SBI’s online banking service will be down for a while, know exactly when)
Corona Delta Variant : कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब, कोरोना विषाणुच्या व्हेरीएंटवर संशोधन होणार https://t.co/pFMJ0UDoqb @mybmc @OfficeofUT @rajeshtope11 @MumbaiPolice #KasturbaHospital #GenomeSequencingLab #Mumbai #CoronaVariants #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
इतर बातम्या
रवी दहियाचं गोल्ड हुकलं, तिहार जेलमध्ये सुशीलकुमारला अश्रू अनावर