Screen Time: फोन आणि लॅपटॉपवर घालवत असाल अधिक वेळ, तर स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
मोबाईल आणि लॅपटॉपच्या अति वापरामुळे स्क्रीन टाइम वाढलेला आहे. याच्या दुष्परिणामांपासून वाचायचे असेल तर स्क्रीन टाईम कमी करणे आवश्यक आहे.
मुंबई, कोरोनाच्या काळात आपल्या जीवनात अनेक बदल घडून आले. यातील अनेक बदल आपल्यासाठी खूप सकारात्मक होते, परंतु काही असे देखील होते ज्यांचा आपल्या जीवनावर खूप वाईट आणि नकारात्मक परिणाम झाला. कोरोना कालावधीच्या या दुष्परिणामांपैकी एक म्हणजे आपला स्क्रीन टाइम (Screen Timing) वाढला. वर्क फ्रॉम होम (Work From Home) संस्कृती रुजल्यामुळे, लोकांचा कामासाठीचा स्क्रीन टाईम तर वाढलाच पण लॉकडाऊनच्या काळात घरात कोंडून राहिल्यामुळे लोकांना मोबाईलवर अतिरिक्त वेळ घालविण्याची सवय लागली. कोरोनाच्या काळात या सवयीमुळे लोकांना आता गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तुम्ही देखील या पैकीच एक असाल आणि तुमचा स्क्रीन टाइम कमी (Reduce Screen Time) करायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करू शकाल.
सोशल मीडियापासून ब्रेक घ्या
स्क्रीन टाइम वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे लोकं सोशल मीडिया साइटवर वेळ घालवतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर डिजिटल ब्रेक घ्या. या ब्रेक दरम्यान, तुम्हाला तुमच्या फोन आणि सोशल मीडिया खात्यांपासून पूर्णपणे दूर राहावे लागेल.
स्क्रोलिंग सवयी बदला
सध्या सोशल मीडियाबाबत लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त, लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ त्यांच्या मोबाईलवर सोशल मीडिया साइट्स पाहण्यात घालवतात. जर तुम्हाला तुमचा स्क्रीन वेळ कमी करायचा असेल, तर सोशल मीडिया साइट्स स्क्रोल करण्याची सवय सोडा.
इतर चांगल्या कामांमध्ये व्यस्त रहा
मोकळ्या वेळेत कंटाळा येऊ नये म्हणून बहुतेक लोक आपला वेळ फोनवर घालवतात, पण जर तुम्हाला स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर तुमच्या मोकळ्या वेळेत मोबाईल वापरण्याऐवजी तुम्ही पुस्तके वाचणे, फिरायला जाणे, मित्रांना भेटणे या गोष्टी करा.