दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास दंड, क्रिप्टो’चे स्वप्नरंजन सेलिब्रिटींना पडणार महागात!

भारतीय जाहिरात मानांकन परिषदचे नवे नियम जारी करण्यात आले असून प्रत्येक जाहिरातीत कंपनीला डिस्क्लेमर दाखवणं आणि बोलणं आवश्यक असणार आहे. अस्वीकरणात असे नमूद करणे आवश्यक आहे की क्रिप्टो उत्पादन अत्यंत धोकादायक असून ते नियमनाशिवाय सुरू आहे.

दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास दंड, क्रिप्टो'चे स्वप्नरंजन सेलिब्रिटींना पडणार महागात!
केवळ बिटकॉईनच नव्हे तर अन्य क्रिप्टोकरन्सीत देखील घसरण नोंदविली गेली.
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 2:45 PM

प्रत्येकाच्या आयुष्यात काही आदर्श असतो. एखादा व्यक्ती आवडतो. आजकाल बहुतेक लोक कलाकार, खेळाडू अशा सेलिब्रिटींना (Celebrity) आपले हिरो मानतात. कोट्यवधी रुपये घेऊन त्यांनी जाहिरात केलेली उत्पादने घेण्याची लोकांना कोण घाई झालेली असते. मग ती उत्पादने योग्य असोत वा चूक ती मिळविण्यासाठी लोक धडपडतात. पण हा धोका तुम्ही वेळीच ओळखलात तर तुम्ही शहाणे अन्यथा तुम्ही तुमच्यासाठी मोठा खड्डा खोदून त्यात पडणार हे नक्की. क्रिप्टोचे (Cryptocurrency) ताजे प्रकरण असे काहीतरी सांगत आहे. त्यामुळे आता थेट बातमीवर येऊयात, एकूणच गोष्ट अशी आहे की क्रिप्टोकरन्सीवर यापूढे सेलिब्रिटींना स्वप्नरंजन करता येणार नाही. क्रिप्टो उत्पादने किंवा आभासी डिजिटल मालमत्तांचे समर्थन करताना सेलिब्रिटींनी काळजी घ्यावी लागणार आहे. भारतीय जाहिरात मानांकन परिषदेने (ASCI) अशा फसव्या जाहिरातींना चाप लावला आहे. अशा जाहिरातींमध्ये केलेले दावे दिशाभूल करणारे नसतील, याची सेलिब्रिटींनी विशेष काळजी घ्यावी असा सल्ला परिषदेने दिला आहे.

अलीकडेच, भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळाने (SEBI) अशी शिफारस केली आहे की, कोणत्याही प्रमुख सार्वजनिक व्यक्तीने, मग तो कलाकार असो किंवा खेळाडू, क्रिप्टो उत्पादनांना प्रोत्साहन देऊ नये. अर्थ मंत्रालयाने सेबीला क्रिप्टो उत्पादनांच्या जाहिरातींच्या मुद्यावर आपले मत मांडण्यास सांगितले होते, तसेच एएससीआयने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वेही त्यांना पाठवण्यास सांगितले होते.

हे सुद्धा वाचा

सेलिब्रिटींसाठी सूचना

एका रिपोर्टनुसार, एएससीआयने सेलिब्रिटींना अशा दाव्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं आहे. त्याचबरोबर जाहिरातीत केलेला दावा खोटा असल्याचे आढळून आल्यास व्हर्च्युअल डिजिटल अॅसेट जोखमीची असल्याने ग्राहक संरक्षण कायद्यात दंडाची तरतूद आहे. लोकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे सेलिब्रिटींनी दिशाभूल करणं टाळावं. सरकारने आधीच क्रिप्टोवर सरकारचा हेतू स्पष्ट केला आहे. लोकांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणे टाळावे अशी सरकारची इच्छा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

एएससीआयने यापूर्वीच क्रिप्टोकरन्सी जाहिरातींसंदर्भात आपले नियम जारी केले आहेत. क्रिप्टो मालमत्तेची जाहिरात करणारऱ्या कोणत्याही कंपनीला जोखीम स्पष्टपणे सांगावी लागेल. हे देखील नमूद करावे लागेल की क्रिप्टो मालमत्तेचे उत्पादन कोणत्याही नियमनाशिवाय सुरू असल्याचे स्पष्ट करावे, यात गुंतवणूकदाराची आर्थिक फसवणूक होत असल्याचा इशारा द्यावा. तसेच गुंतवणूक करायची असेल तर त्याची संपूर्ण जबाबदारी गुंतवणूकदाराची असेल हे स्पष्ट कळवावे. वास्तविक, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने डिजिटल अॅसेटवर जास्त कर लावण्याची घोषणा केली होती आणि याच आधारावर ती लॉटरीच्या बरोबरीची मानली जात होती. आता डिजिटल अॅसेट देणाऱ्यांनी हीच गोष्ट ज्यांनी पुढे केली त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, अशी सरकारची इच्छा आहे. यामुळे ग्राहकांना क्रिप्टोशी संबंधित विविध धोक्यांची जाणीव होऊ शकेल.

एएससीआयचे नवे नियम जारी करण्यात आले असून प्रत्येक जाहिरातीत कंपनीला डिस्क्लेमर दाखवणं आणि बोलणं आवश्यक असणार आहे. अस्वीकरणात असे नमूद करणे आवश्यक आहे की क्रिप्टो उत्पादन अत्यंत धोकादायक आणि नियमनाशिवाय सुरू आहे. क्रिप्टो किंवा एनएफटीशी संबंधित जाहिरातींची संख्या सतत वाढत असताना ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. त्यामुळे भ्रामक समजुतीतून ग्राहकांना आर्थिक फटका बसणार नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.