Bank Holiday in June : तुम्हाला बदलवायच्यात 2000 रुपयांच्या नोटा, मग बँकेच्या सुट्या तर जाणून घ्या

Bank Holiday in June : 2000 रुपयांच्या नोटा बदलविण्यापूर्वी जून महिन्यात बँकांना किती दिवस सुट्या आहेत, ते समजून घ्या. नाहीतर नाहक चक्कर व्हायची...

Bank Holiday in June : तुम्हाला बदलवायच्यात 2000 रुपयांच्या नोटा, मग बँकेच्या सुट्या तर जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 8:39 PM

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आदेशानंतर आता देशभरातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा माघारी घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 19 मे रोजी, शुक्रवारी या गुलाबी नोटा माघारी बोलविण्याची घोषणा झाली. त्यानुसार, 23 मेपासून या नोटा बँकेत जमा करुन घेण्यात येत आहेत. आता मे जवळपास संपणार आहे. एक आठवड्यानंतर जून महिना सुरु होईल. त्यात शनिवार-रविवारची सुट्टी आलेली आहे. त्यामुळे बँकेत या नोटा बदलविण्यासाठी जाण्यापूर्वी जून महिन्यात किती दिवस बँका बंद (Bank Closed) राहतील हे जाणून घ्या.

जून महिन्यात इतक्या दिवस सुट्टी तुम्ही बँकेत नोटा बदलविण्यासाठी जाणार असाल तर अगोदर जून महिन्यात किती दिवस बँकांना ताळे लागलेले असेल, ते माहिती करुन घ्या. त्यानंतर बँकेत जाण्याची तयारी करा. आरबीआयच्या संकेतस्थळानुसार, रविवार आणि शनिवार मिळून जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. देशात वेगवेगळ्या प्रांतातील प्रथा, सण, उत्सव याप्रमाणे बँकांना सुट्टी असते. जून महिन्यात एकूण 12 दिवस बँका बंद राहतील.

महत्वपूर्ण बदल RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एका मर्यादेपर्यंत या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणताही अर्ज अथवा ओळखपत्र दाखविण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

रोख द्या आणि रोख न्या आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील बँकांच्या व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील, असा एक सवाल विचारण्यात येतो. तर या बिझनेस करस्पॉन्डेंट सेंटरवर खातेदाराला 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलविता येतील

जून महिन्यातील सुट्यांची यादी

  1. 4 जून रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशात बँकांना सुट्टी
  2. 10 जून रोजी दुसऱ्या शनिवारी, संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी
  3. 11 जून रोजी रविवार असल्याने बँका राहतील बंद
  4. 15 जून वाईएमए डे आणि इतर सण, आईजॉल आणि भुवनेश्वरमध्ये बँका बंद
  5. 18 जून रोजी रविवारी सर्व बँकांना ताळे
  6. 20 जून रोजी रथयात्रा, भुवनेश्वर आणि इंफालमध्ये बँका बंद
  7. 24 जून रोजी चौथ्या शनिवारी देशातील बँका बंद
  8. 25 जून रोजी रविवारी देशातील बँकांना हक्काची सुट्टी
  9. 26 जून रोजी अगरतळा येथील बँकांना सुट्टी
  10. 28 अथवा 29 जून रोजी बकरी ईदमुळे वेगवेगळ्या ठिकाणी सुट्टी
  11. 30 जून रोजी आईजॉल आणि भुवनेश्वरमध्ये बँक कर्मचाऱ्यांना विश्रांती

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.