बाजार धडपडला; सुरुवातीच्या सत्रात पडझड, एशियन पेंट्स, बजाज ऑटोचा गुंतवणुकदारांना दिलासा

बेंचमार्क निर्देशांक बाजार पूर्वसत्रातच कोमात गेला होता. सकाळी 9:02 वाजता, सेन्सेक्स 79.46 अंकांनी (0.15%) खाली येत 52452.61 अंकावर पोहचला आणि निफ्टी 169.60 अंक (1.08%) खाली येत 15469.20 अंका वर आला होता.

बाजार धडपडला; सुरुवातीच्या सत्रात पडझड, एशियन पेंट्स, बजाज ऑटोचा गुंतवणुकदारांना दिलासा
बाजारात सुरवातीच्या सत्रात पडझडImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 11:15 AM

गेल्या दोन दिवसांपासून असलेले तेजीचे सत्र शेअर बाजार (Share Market) सुरु होताच संपले, आज बाजाराने नकारात्मक सुरुवात केली. बाजाराची सुरवात पडझडीनेच झाली. बेंचमार्क निर्देशांक निफ्टीची (Nifty) 15600 अंक खाली सुरवात झाली.सेन्सेक्स (BSE Sensex) 377.58 अंकांनी घसरून 52154.49 अंकावर आला आणि निफ्टी 119.80 अंकांनी घसरून 15600 अंकावर आला. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची (IT Company) बाजाराच्या सुरुवातीलाच पडझड झाली. टाटा स्टील, एनटीपीसी, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, टायटन आणि रिलायन्स यांना सेन्सेक्सवर प्रभाव दाखवता आला नाही. डॉ. रेड्डीज, एचयूएल आणि एशियन पेंट्स या मूठभर लाभधारकांनी बाजारात ग्रीन लाईन पकडली. तेल आणि वायू, धातू, उर्जा, रियल्टी, आयटी, बँक आणि भांडवली वस्तू निर्देशांक 1-3% खाली व्यापार करत आहेत. व्यापक बाजारपेठांमध्ये, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.8% पर्यंत घसरले.

BSE Sensex घसरला

टाटा स्टील, एनटीपीसी, विप्रो, टेक एम, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, टायटन आणि रिलायन्स यांना सेन्सेक्सवर तोटा सहन करावा लागला. डॉ. रेड्डीज, एचयूएल आणि एशियन पेंट्स या कंपन्यांच्या शेअरने गुंतवणुकदारांना फायदा करुन दिला.

हे सुद्धा वाचा

Nifty शेअरची कामगिरी घसरली

हिंदाल्को इंडस्ट्रीज, ओएनजीसी, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील आणि कोल इंडिया हे निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरले, तर डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, एशियन पेंट्स, एचयूएल, बजाज ऑटो आणि एचडीएफसीचे शेअर आज सुरुवातीच्या सत्रात वधारले.

आशियाई बाजार

आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील समभागांनी बुधवारी संमिश्र व्यापार केला. जपानच्या निक्केई ला फारसा प्रभाव दाखविता आला नाही. टॉपिक्स 0.14 टक्के वधरला होता. कोस्पी 1.1 टक्क्यांनी घसरला, तर कोस्डॅक बाजार 1.41 टक्क्यांनी घसरला.

परदेशी गुंतवणुकदारांची विक्री सुरुच

NSE वर उपलब्ध तात्पुरत्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FIIs) 2,701.21 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ विक्री केली आहे, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदार (DIIs) 21 जून रोजी 3,066.41 कोटी रुपयांच्या समभागांची निव्वळ खरेदीदार राहिले आहेत.

तेलाच्या किंमती घसरल्या

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी वाढत्या इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी केलेल्या दबावामुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात तेलाच्या किमती घसरल्या. सध्या उन्हाळ्यात इंधनाची मागणी जास्त असते. चालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने अमेरिकन तेल उत्पादक कंपन्यांवर पुरवठ्यासाठी दबाव आणला आहे.

काल बाजार मजूबत स्थितीत

मंगळवारी सुरुवातीच्या सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) , एचडीएफसी बँक (HDFC Bank) , एचडीएफसी (HDFC) सारखे शेअरने आगेकूच केल्याने बीएसई निर्देशांक आणि एनएसई निफ्टी यांनी तेजीचा योग साधला होता. दुपारच्या सत्रात बाजाराने 800 अंकांची चढाई केली. गेल्या तीन आठवड्यानंतर बाजाराने दिमाखात दुसरे सत्र गाठले आहे. निर्देशांक 861.28 अंकांनी वाढून 52,459.12 अंकावर तर निफ्टीत 263.25 अंकांनी वाढून 15,613.40 अंकावर पोहचला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.