Government Companies | सरकारी कंपन्यांचे शेअरही करतील मालामाल, वेळेत करा गुंतवणूक..

Government Companies | सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर चांगला परतावा देत नाही, असा सर्वमान्य गैरसमज आहे. आकड्यांवर नजर टाकली तर या कंपन्यांचे शेअर ही चांगला परतावा देत असल्याचे दिसून येईल. याविषयीची माहिती घेऊयात..

Government Companies | सरकारी कंपन्यांचे शेअरही करतील मालामाल, वेळेत करा गुंतवणूक..
सरकारी कंपन्यांतील फायदेशीर गुंतवणूकImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 11:19 AM

Government Companies | सार्वजनिक क्षेत्रातील ( public sector) कंपन्यांचे शेअर (Share) चांगला परतावा देत नाही, असा सर्वमान्य गैरसमज आहे. आकड्यांवर नजर टाकली तर या कंपन्यांचे शेअर ही चांगला परतावा देत असल्याचे दिसून येईल. एनआई रिसर्चचे (NI Research) संचालक किशोर ओस्तवाल यांच्या मते गुंतवणूक चांगल्याच कंपन्यांमध्ये करावी. सरकारी कंपनी असली तरी त्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. या कंपन्यांनी चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांसोबतच गुंतवणूकदारांनी (Investors) सरकारी कंपन्यांवरही विश्वास दाखवायला हवा.

निवडणुकांचा असाही प्रभाव

आकड्यांवर नजर टाकली की एक विलक्षण गोष्ट लक्षात येईल. निवडणुकांपूर्वी नेहमीच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये सुधारणा होते. नवीन सरकार सुधारणा करेल. निधी देईल या आशेवर कंपन्यांची कामगिरी सुधारते आणि त्याआधारे कंपन्या पुढील दोन वर्षे दमदार कामगिरी करतात.

चांगले क्रेडिट रेटिंग

सरकारी कंपन्यांमध्ये चांगला फायदा होतो. त्यांचे क्रेडिट रेटिंग चांगले असते. त्यांना कर्ज अथवा उधार घेण्याची कमी गरज पडते. या कंपन्यांमध्ये प्रमोटर नसतात. त्याचा परिणाम लाभांश देताना होतात. या कंपन्यांची हमी सरकार घेते. परिणामी लाभांश ही जोरदार मिळतो.

हे सुद्धा वाचा

खासगी बँकेचा सरकारी शेअर

आयसीआयसीआय प्रडेंशियल म्युच्युअल फंडने सार्वजनिक उपक्रमातील कंपन्यांचा एक वेगळा इक्विटी फंड सुरू केला आहे. आता बोला, म्हणजे तुम्ही सरकारी कंपन्यांना नावे ठेवणार. खासगी कंपन्यांचे कौतूक करणार. पण आता त्यांचा एक ओपन-एंडेड इक्विटी फंड तयार करण्यात आला आहे.

तीनही मार्केट कॅपमध्ये गुंतवणुकीची संधी

आयसीआयसीआय प्रडेंशियल म्युच्युअल फंडने गुंतवणुकदारांना दीर्घकालीन म्हणजे लार्ज, मीड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणुकीची संधी दिली आहे. ही गुंतवणूक सरकारी कंपन्यांत दीर्घ कालीन असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळेल.

मोठा हिस्सा सरकारकडे

सरकारी कंपन्यांमध्ये विदेशी पोर्टफोलिया गुंतणूकदार, संस्थागत गुंतवणूकदार यांची संख्या मर्यादीत असते. सरकारकडे कंपनीतील सर्वात मोठा हिस्सा असतो. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांमधील गुंतवणूक जोखमीची ठरत नाही. या गुंतवणुकीची हमी सरकारच एकप्रकारे घेते. हे पण गुंतवणुकीसाठीचे मुख्य आकर्षण ठरते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.