Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC IPO : एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरूच; आतापर्यंत 94,116 कोटी रुपयांचा फटका, गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी?

एलआयसीच्या शेअरमध्ये आयपीओ लिस्ट झाल्यापासून घसरण सुरूच आहे. सलग 14 सत्रांमध्ये कंपनीचा शेअर घसरला आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल 94,116 कोटी रुपये बुडाले आहेत.

LIC IPO : एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण सुरूच; आतापर्यंत 94,116 कोटी रुपयांचा फटका, गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी?
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 11:25 AM

शेअर मार्केटमध्ये (Share Market) सर्वात मोठा आयपीओ (Biggest IPO) आणलेल्या एलआयसीची (LIC) अवस्था बिकट झाली आहे. एलआयसीचा शेअर प्रत्येक सत्रात कोसळताना दिसत आहे. एलआयसीच्या शेअरचे मूल्य कमी झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. सलग चौदा सत्रांमध्ये एलआयसीच्या शेअर्समधील घसरण सुरूच असून, एलआयसीची मार्केट कॅप तब्बल 94 हजार कोटी रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात शेवटच्या दिवशी शुक्रवारी एलआयसीचा शेअर्स 800.05 रुपयांच्या पातळीपर्यंत घसरला आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यातच एलआयसीचा शेअर्स 7.72 टक्के म्हणजे 67 रुपयांनी घसरला होता. घसणीमुळे एलआयसीच्या मार्केट कॅपला मोठा धक्का बसला असून, एलआयसीची मार्केट कॅप 6,00,242 कोटी रुपयांहून कमी होऊन 5,06,126 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. याचाच अर्थ आतापर्यंत गुंतवणूकदारांचे तब्बल 94,116 कोटी रुपये बुडाले आहेत.

एलआयसीची पिछेहाट

एलआयसीच्या आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. पहिल्याच दिवशी एलआयसीचा शेअर्स 13 टक्क्यांनी घसरला. तो शेवटी 8.62 टक्क्यांच्या घसरणीसह 81.80 रुपयांवर स्थिरावला. इश्यू किमतीच्या तुलनेत आतापर्यंत एलआयसीचे शेअर्स 15 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. एलआसीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू असल्याने कंपनीच्या रॅंकमध्ये देखील घसरण झाली आहे. एलआयसीला मागे टाकत आयसीआयसीआय बँक सातव्या नंबरवर पोहोचली आहे. जेव्हा एलआयसीचा आयपीओ बाजारात सूचीबद्ध झाला होता. तेव्हा एलआयसी ही बीएसई लिस्टेड पाचवी सर्वात मोठी कंपनी होती. मात्र आता ती आठव्या नंबरवर पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांनी काय करावे?

एलआयसीच्या शेअर्समध्ये सुरुवातीपासूनच पडझड पहायला मिळत होती. पहिल्याच दिवशी एलआयसीचा शेअर्स घसरल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. तेव्हा तज्ज्ञांकडून असा सल्ला देण्यात आला होता की, सध्या जरी एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण सुरू असली तरी भविष्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी पहायला मिळू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एलआयसीमधील गुंतवणुकीचा दीर्घकाळ गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार करावा. ज्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळ गुंतवणूक करणे शक्य नाही. त्यांनी एलआयसीमधील आपली गुंतवणूक कमी करावी. दरम्यान आता एलआयसीचे शेअर्स आणखीनच घसरल्याने गुंतवणूकदारांना जर झालेले नुकसान भरून काढायचे असेल तर दीर्घकाळ गुंतवणुकीशिवाय पर्याय नसल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक
प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक.
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप
औरंगजेबने संभाजींना मनुस्मृतीप्रमाणे.., काँग्रेस नेत्याचा खळबळजनक आरोप.
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं
धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले 6 ते 7 अर्भकं.
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली
दिशा सालियन प्रकणात ठाकरे फसणार? अ‍ॅड. ओझांनी आरोपींची नावंच सांगितली.
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल
बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? मुख्यमंत्र्यांचा थेट सवाल.
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'
संजय राऊतांना राजकीय नेते मंडळींकडून शिवीगाळ, 'हारामXXX अन्...'.
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?
जयकुमार गोरे प्रकरणात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात?.