Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एफडीमध्ये गुंतवणूक करावी का? केल्यास कालवधी किती असावा; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

आरबीआयकडून सध्या रेपो रेटमध्ये वाढ सुरू आहे. रेपो रेट वाढल्याने बँक देखील एफडीच्या व्याज दरात वाढ करत आहेत. अशा स्थितीमध्ये एफडीत गुंतवणूक करावी का?, केल्यास तिचा कालावधी किती असावा जाणून घेऊयात.

एफडीमध्ये गुंतवणूक करावी का? केल्यास कालवधी किती असावा; जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 2:55 PM

मुंबई : आरबीआयकडून गेल्या बुधवारी रेपो रेटमध्ये (Repo rate) 50 बेसीस पॉईंटची वाढ करण्यात आली. आता रेपो रेट 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या रेपो रेटचा सर्वाधिक फायदा हा ज्या लोकांची बँकेत एफडी आहे, त्यांना झाला आहे. रेपो रेट वाढीनंतर बँकांनी एफडीवरील व्याज दरात देखील वाढ केली आहे. खासगी बँकांसोबतच सरकारी बँका देखील एफडीवरील (FD) व्याज दरवाढीमध्ये आघाडीवर आहेत. दरम्यान पुढील काही महिन्यांत आरबीआयकडून रेपो रेटमध्ये आणखी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एफडीवरील व्याज दर (FD Rates) देखीाल वाढू शकतात. अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे कोणत्या बँकेत एफडी करावी व ती किती कालावधीची करावी त्यामुळे सर्वाधिक फयाद होऊ शकतो. मात्र एफडी करताना ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवावी लागते की, जर समजा व्याज दर कपातीला सुरुवात झाली तर जास्त नुकसान होणार नाही. एफडी कितीची करावी, कोणत्या बँकांमध्ये करावी, एफडीचा कालावधी किती असावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञांच्या मतानुसार आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. मात्र अर्थव्यवस्था रुळावर येत असताना दुसरीकडे देशात महागाईचा देखील भडका उडाला आहे. महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी आता आरबीआयकडून रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येत आहे. चालू वर्षात दोनदा रेपो रेट वाढवण्यात आले आहेत. व पुढेही रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. साहाजिकच रेपो रेट वाढल्यानंतर बँका एफडीवरील व्याज दर वाढू शकतात. त्याचा फायदा हा गुंतवणूकदारांना होऊ शकतो. मात्र ज्याप्रमाणात महागाई वाढत आहे, त्या प्रमाणात एफडीतून कधीही परतावा मिळत नाही. तसेच व्याज दरात कपात सुरू झाल्यास काय करायचे असा प्रश्न देखील असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एफडीसोबतच इतर पर्यायाचा देखील शोध घेतला पाहिजे.

हे सुद्धा वाचा

एफडीचा कालावधी किती असावा

अनेकांना हा प्रश्न पडतो की आपन बँकेत जी एफडी करणार आहोत तिचा कालावधी किती असावा? यावर उत्तर देताना गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात की छोट्या कालावधीची एफडी कधीही फायद्याची ठरते. सध्या आरबीआयकडून रेपो रेट वाढवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला सध्या एफडीवर अधिक व्याज मिळत आहे. मात्र जेव्हा आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात करण्यात येते तेव्हा तुमच्या एफडीवरील व्याज दर देखील कमी होतो. अशा स्थितीमध्ये तुमची एफडी जर दीर्घ कालावधीची असेल तर तुम्हाला मोठा तोटा होण्याची शक्यता असते. मात्र तुमची जर एफडी कमी कालावधीची असेल तर तुमचा फार तोटा होणार नाही. तुम्ही एफडीमधून मिळालेले पैसे आणखी कुठल्यातरी दुसऱ्या योजनेत गुंतवू शकता.

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.