जगातल्या महागड्या शहरात यंदा या दोन शहरांचा समावेश, इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटची माहीती

जगातील रहाणीमानाच्या दृष्टीने सर्वात महागड्या शहरांची यादी इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ( EIU ) गुरूवारी जाहीर केली आहे. यात गेली 11 पर्यटनासाठी महत्वाचे असलेले एक शहर पहिल्या क्रमांकावर राहीलेले आहे. पाहा कोणते ते शहर ?

जगातल्या महागड्या शहरात यंदा या दोन शहरांचा समावेश, इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटची माहीती
singapore Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 3:51 PM

मुंबई | 30 नोव्हेंबर 2023 : जगातील रहाणीमानाच्या दृष्टीने सर्वात महागड्या शहरांच्या यादीत सिंगापूर आणि ज्यूरीक या शहरांचा क्रमांक लागला आहे. त्यानंतर महागड्या शहरात जिनेव्हा, न्यूयॉर्क आणि हॉंगकॉंगचा समावेश झाला आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने ( EIU ) गुरूवारी ही महागड्या शहराची यादी जाहीर केली आहे. इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने रहाणीमानाच्या महागाईचे संकट अजून संपलेले नसल्याचे म्हटले आहे. रोजच्या वापरातील 200 हून अधिक वस्तू आणि सेवांच्या किंमतीत स्थानिक चलनदरानूसार सरासरी 7.4 टक्के वाढ झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा ( 8.1% ) ही वाढ कमीच असली तरीही साल 2017-2021 च्या तुलनेत ही वाढ खूपच जास्त म्हटली जात आहे.

अनेक श्रेणीत वाढलेल्या महागाईमुळे सिंगापूरने गेल्या 11 वर्षांमध्ये नऊ वेळा रॅंकिंगमध्ये महागड्या रहाणीमानात प्रथम क्रमांक कायम राखला आहे. कारच्या संख्येवर असलेले कठोर निर्बंध, जगात सर्वाधिक जास्त परिवहन साधनाच्या किंमती, अर्थात महागड्या कार यामुळे सिंगापूर महागडे शहर आहे. येथे कपडे, किराणा सामान आणि मद्याच्या किंमती देखील जास्त आहेत.

झ्युरीक कसे पोहचले वरती

स्वित्झर्लंड देशातील सर्वात मोठे शहर झ्युरिक युरोपातील सर्वात श्रीमंत शहर म्हटले जाते. स्विस फ्रॅंकची ताकद, किराणाचे सामान, घरगुती सामान आणि मनोरंजनासाठी येथे मोठी किंमत मोजावी लागते. तर जिनेव्हा आणि न्यूयॉर्क संयुक्तरुपाने महागाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर महागाईत हॉंगकॉंगचा नंबर पाचवा आणि लॉसएंजिल्सचा सहाव्या क्रमांकावर आहे.

आशियात घसरण

आशियात अन्य क्षेत्राच्या तुलनेत सरासरी किंमतीत कमी वाढ पाहीली जात आहे. चीन शहरांच्या रॅकींगमध्ये घसरण झाली आहे. चीनच्या नानजिंग, वूशी, डालियान आणि बीजिंग या चार शहरांचे आणि जपानच्या ओसाका आणि टोकीयो या शहरांच्या रॅकिंगमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.